महाराष्ट्र हादरला! HIV बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भपातामुळे खळबळजनक घटना उघड

क्राईम महाराष्ट्र

संभाजीनगर: धाराशिवमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. तसेच बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या मुलीचा केला गर्भपात देखील करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

औसा तालुक्यातील एका नामवंत एचआयव्ही बाधित संगोपन संस्था आहे. या संस्थेत एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. तसेच बलात्कारनंतर सदर मुलीचा गर्भपातदेखील केला. या गर्भपातामुळे सदर धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पीडित मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीच्या तक्रारीवरून ढोकी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

नेमकं काय घडल

औसा तालुक्यातील एका नामवंत एचआयव्हीबाधित संगोपन संस्थेतील घटना घडली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून ढोकी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. या संस्थेतील आणखी काही मुलींवर अत्याचार झाला असल्याची मुलीची तक्रारीत माहिती आहे. ढोकी पोलिसातील गुन्हा औसा पोलिसांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अद्यापपर्यंत कोणालाही अटक नाही. औसा तालुक्यातील या नामवंत संस्थेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे या घटनेने शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्येही धक्कादायक प्रकार

कोचिंग क्लासेसमध्ये झालेल्या दोन मुलीच्या भांडणावरुन एका मुलीच्या आई वडिलांनी काही लोकांच्या मदतीने दुसऱ्या मुलीच्या आईवडिलांना घरात घुसून अमानुष मारहाणकेल्याची घटना घडली आहे. तसेच आईसोबत घाणेरडे वर्तन केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपी आई वडिलांनी दुसऱ्या महिलेला पायावर नाक घासायला लावून माफी मागायला लावल्याचा प्रकार देखील घडला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातील सर्वेश्वरनगरमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप लंके आणि त्याची पत्नी आणि अनोळखी दोघे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मारहाण झालेल्या संदीप श्रीधर शिंदे रा. सर्वेश्वरनगर, सातारा यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या या वादात फिर्यादी शिंदे यांच्या पत्नीला जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या पाठीवर, हातावर, चेहऱ्यावर मारहाणीचे वळ स्पष्ट दिसून येत आहेत.