पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक, पहा कारण…

क्राईम

मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), फोन टॅपिंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. त्यांना यापूर्वी ईडीने अटक केली होती. दरम्यान न्यायालयाने संजय पांडे यांना अधिक तपासासाठी 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना या अगोदर दिल्ली ईडीकडून अटक झाली होती. आणि त्यांची चौकशीही सुरु होती. दरम्यान, 2 ऑगस्टला त्यांना रोज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं त्यांना 16 ऑगस्टपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर पांडे यांच्यावतीन जामिनासाठी देखील अर्ज दाखल करण्यात होता. परंतु त्यांना जामीन मिळाला नव्हता.

पांडे हे 30 जून रोजी निवृत्त झाले आहेत. 2009 ते 2017 दरम्यान NSE कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा त्याच्यावर आरोप असून त्यासाठी आयएसईसी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने त्यांना 4.45 कोटी रुपये दिल्याचे समोर आले होते