शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील एका महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन युवतीबाबत बदनामीकारक मेसेज तिच्या नातेवाइकांना पाठवून तसेच युवतीला रस्त्यात अडवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बालाजी रणजीत पाटील या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील अल्पवयीन युवती महाविद्यालयीन शिक्षण घेत असून गावातील बालाजी पाटील याने युवतीला रस्त्यात अडवून तिचा हात पकडत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर युवकाने युवतीच्या काही नातेवाइकांचे मोबाईल नंबर मिळवून युवतीबाबत बदनामीकारक मेसेज देखील युवतीच्या नातेवाइकांना पाठवले.
याबाबत सदर युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी बालाजी रणजीत पाटील (वय २०) रा. टाकळी भीमा (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे व पोलीस शिपाई अविनाश पठारे हे करत आहे.