खळबळजनक! शिरूर पोलिस स्टेशनच्या लॉकमधून आरोपी फरार…

क्राईम

शिरूरः शिरूर पोलिस स्टेशनमध्ये शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील घरफोडी चोरीतील आरोपी शिरुर लॉकअपमधे ठेवला होता. पहाटेच्या वेळी लॉकअपमधील कौल उचकटून रेवण उर्फे बंटी बिरु सोनटक्के (वय २२, रा. वारजे माळवाडी पुणे) हा आरोपी पळून गेला आहे.

आरोपी रेवण याला पळून जाण्यास मदत करणारा अक्षय काळे (रा. चिंचोडी पाटील ता. जि. अहमदनगर) या दोघांवर शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनमध्ये मोठी खळबळ उडाली असून, आरोपीची पथकांमार्फत शोधाशोध सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, आरोपी हा पहाटेच्या वेळी पळून गेला असून, सकाळी सहा वाजता लॉकअप गार्डची ड्युडी बदलत असताना हा प्रकार उघडकीस आला. घरफोडी प्रकरणात अटक असलेला हा आरोपी काही दिवसांपुर्वी उस्मानाबाद येथील कस्टडीमधून पळून गेला होता. हे सर्व माहिती असून आरोपीवर लक्ष न ठेवल्यामुळे पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्याच्यावर इतरही अनेक गुन्हे दाखल आहे. तसेच नुकतेच बाबुराव नगर येथे जबरी चोरी, दिप वाईन्स समोर जिवघेणा हल्ला, सतत होणाऱ्या विद्युत मोटार चोरी यामुळे कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, चोरांना धाक राहीलेला नाही. त्यामुळे पोलिस अधिक्षक यावर काय कारवाई करतात याकडे शिरूर तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे.