शिक्रापुरात येऊन शिक्षण मंत्र्यांनी फिरवली वाबळेवाडीकडे पाठ

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेली वाबळे वाडी शाळा काही भ्रष्टाचारामुळे चांगलीच चर्चेत आलेली असताना गावातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेतली असता त्यांनी वाबळेवाडी शाळेला भेट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शिक्षणमंत्री शिक्रापूर येथे आलेले असताना देखील त्यांनी वाबळेवाडी शाळेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आंतरराष्ट्रीय वाबळेवाडी शाळेवर गैरकारभाराचे आरोप झाल्यानंतर शाळेच्या अनेक चौकशा झाल्या. दरम्यान शाळेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. तसेच तत्कालीन मुख्याध्यापक राष्ट्रपती पुराक्सार विजेते दत्तात्रय वारे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

यावेळी अनेक राजकीय लोकांना हाताशी धरण्यात आले, तर काही स्थानिक नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या त्यांनतर सध्या सरकार मध्ये बदल झाल्यानंतर देखील काही स्थानिक पुढाऱ्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून नुकतीच शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची मुंबई येथील रामटेक बंगला येथे भेट घेतली होती.

त्यावेळी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याशी गावातील पदाधिकाऱ्यांची विकास कामांसाठ वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेबाबत चर्चा झाली त्यावेळी त्यांनी लवकरच शिक्रापूर येथे वाबळेवाडी शाळेला आपण भेट देणार असल्याचे सांगितले.

नुकतेच शिरुर तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी शिक्षणमंत्री दिपक केसरकर आलेले असताना ते शिक्रापूर मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना भेटले तसेच शिवसेनेच्या शिरुर तालुका पदाधिकाऱ्यांसह वाहनातून गेले. मात्र त्यांनी शिक्रापूर मध्ये येऊन देखील वाबळेवाडी शाळेकडे पाठ फिरवल्याने शिक्षण मंत्र्यांनी वाबळेवाडी शाळेकडे पाठ फिरवल्याची चर्चा चांगलीच रंगली.