करंदीत दुग्धव्यवसायाच्या वादातून दोघा भावांना बेदम मारहाण

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील भारत गॅस फाटा येथे दुग्धव्यवसायाच्या वादातून दोघा भावांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शाम कबु आहिर, भुपत कबु आहिर, मिठा कबु आहिर, देवकन सिधा सभाड या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील भारत गॅस फाटा येथे नागजी सोंडला व त्यांचे भाऊ रुपेश सोंडला हे गिर गायांचा सांभाळ करुन दुग्धव्यवसाय करत असून त्यांच्या व्यवसायातून त्यांचा शाम आहिर यांच्या सोबत वाद झालेला होता. २४ मार्च रोजी सोंडला हे दोघे भाऊ त्यांच्या ताब्यातील जि जे १२ सि बी ४९०८ या कार गाडीतून करंदी गावातून जात असताना शाम आहिर सह चौघे जण एका कार मधून आले त्यांनी सोंडला यांना अडवून लोखंडी गज, लाकडी दांडके व गजाने मारहाण करुन जखमी केले.

याबाबत नागजी भवांन सोंडला (वय ५0) रा. पिंपळे जगताप (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी येथे शाम कबु आहिर, भुपत कबु आहिर, मिठा कबु आहिर, देवकन सिधा सभाड चौघे रा. झारगडवाडी ता. आंबेगाव जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.