Indian Boy and Chinese Girl Love Marriage

भारतीय युवकाचा चिनी युवतीसोबत प्रेमविवाह; सोशल मीडियावर चर्चा…

देश

नवी दिल्लीः भारतीय युवकाचा चिनी युवतीसोबत प्रेमविवाह झाला असून, दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. युवकाचे नाव अवी तर सँडी युवतीचे नाव आहे. दोघांची प्रथम फ्रान्समध्ये भेट झाली होती.

अवी हा हरियाणाचा रहिवासी आहे. सँडी ही चीनची राजधानी बीजिंगची रहिवासी आहे. ऑगस्ट 2011 मध्ये फ्रान्समध्ये पहिल्यांदा दोघांची भेट झाली होती. अवीने हरियाणातील शहरात शालेय शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर सुमारे दोन वर्षे नोएडा येथे नोकरी केली. त्यानंतर एमबीए करण्यासाठी तो पॅरिसला गेलो. जिथे त्याची भेट सँडीशी झाली. दोघे एकाच विद्यापीठातून शिकत होते.

विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. पहिल्या भेटीनंतर दोघेही फिरायला गेले. त्यानंतर मेसेजिंग सुरु झाले होते. त्यानंतर पुन्हा दोघेही कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीमध्ये भेटले. या पार्टीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर ते एका डेटवर गेले, जिथे अवीन सॅडीला प्रपोज केले. ‘तू माझी प्रेयसी होशील का’, असे प्रपोजल त्याने सॅंडी समोर ठेवले, आणि सँडीने देखील त्याला होकार कळवला.

रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर दोघांनी एकमेकांना 5 वर्ष लॉंग डिस्टेन्समध्ये डेट केले. त्यानंतर 2018 मध्ये सॅंडी पहिल्यांदा भारतात आली होती. यादरम्यान अवीने सँडीशी सरप्राईज पद्धतीने एंगेजमेंट केली. सँडीला एंगेजमेंटची काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर दोघांनीही त्याच वर्षी कोपनहेगनमध्ये लग्न केले. या लग्नाला दोन्ही बाजूचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. अवी आणि सँडी यांनी त्यांची संपूर्ण लव्ह स्टोरी यूट्यूब चॅनलवर सांगितली आहे. तसेच ते त्याचे लव लाईफचे किस्से सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघांच्या प्रेमविवाहाची सोशल मीडियावर चर्चा आहे.