shirur-taluka-logo

अभिनेता सिद्धार्थ रे यांचा चाळीशीत मृत्यू; मुलगा काय करतो पाहा…

मनोरंजन

मुंबई: अभिनेता सिद्धार्थ रे यांनी ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटात शंतनू माने नावाची धमाल भूमिका केली होती. अजरामर केलेली ही भूमिका नागरिक अद्यापही विसरलेले नाहीत. अभिनेता शाहरूख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला बाजीगर हा चित्रपट 90च्या दशकात प्रसिद्ध झाला होता.

बाजीगर चित्रपटातील छुपाना भी नहीं आता हे गाणं हिट झाले होते. आजही या गाण्याला मोठी पसंती मिळत आहे. हे गाणं ऐकल्यावर अभिनेता सिद्धार्थ रे सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. हे गाणे काजोल, शाहरुख खान आणि अभिनेता सिद्धार्थ रे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. चित्रपटात सिद्धार्थ काजोलचा जवळचा मित्र आणि पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता. ज्याला काजोलवर मनापासून प्रेम असते पण ते त्याला सांगता येत नाही. या चित्रपटात करण मल्होत्राच्या भूमिकेत सिद्धार्थ सर्वांनाच चांगलाच आवडला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shishya Ray (@mr.raywillhavehissay)

सिद्धार्थने साऊथची अभिनेत्री आणि अक्षय कुमारची सौगंध चित्रपटातील पहिली अभिनेत्री शांतीप्रियासोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत. सिद्धार्थ रे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४० मध्येच मृत्यू झाला होता. पण, आजही त्यांचे चाहते आठवण काढतात. सिद्धार्थ रे यांचा मुलगा शिष्या आता मोठा झाला आहे. शिष्या सध्या पटकथा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून चित्रपटांमध्ये काम करत आहे. शिष्या मोठा होऊन वडिलांसारखाच दिसत आहे. त्याने त्याचे लहानपणीचे फोटो आणि आई-वडिलांचे फोटोही शेअर केले आहेत. शिष्याचा लेटेस्ट फोटो पाहून लोकांना बाजीगरमधील करण मल्होत्राची आठवण येत आहे.

सिद्धार्थ रे यांचा जन्म मुंबईतील मराठी-जैन कुटुंबात झाला होता. त्यांचे आजोबा निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही शांताराम होते. सिद्धार्थ यांना लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा होती, त्यानंतर त्याचे आजोबा व्ही शांताराम यांनी 1977 मध्ये चानी हा मराठी चित्रपट बनवला होता. त्या चित्रपटामधून सिद्धार्थने पदार्पण केले. सिद्धार्थ यांनी मराठीत अनेक चित्रपट केले. गंगा का वचन, वंश, युद्धपथ, परवाने, बाजीगर, मिलिट्री राज, बिच्छू, पिता, जानी दुश्मन: एक अनोखी प्रेम कहानी आणि चरस: अ ज्वॉइंट ऑपरेशन अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. पण, वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी पत्नी आणि दोन मुलांना सोडून या जगाचा निरोप घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shishya Ray (@mr.raywillhavehissay)