PM-Kisan

PM किसान योजना , KYC साठी 31 जुलै अंतिम मुदत

इतर

मुंबई: PM किसान या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सरकारने KYC करणे बंधनकारक केले आहे. याची शेवटची मुदत 31 जुलै 2022 असुन जे शेतकरी KYC करणार नाहीत, त्यांना 12 वा हप्ता मिळणार नसल्याचे सरकारने म्हंटले आहे. लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम जमा केली जाते. मात्र ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेच्या नियमांमध्ये अनेक बदल झाले आहेत.

unique international school
unique international school

PM किसान साठी दोन प्रकारे e-KYC करता येते. जर शेतकऱ्यांनी स्वत: OTP द्वारे e-KYC केले तर त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. मात्र कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन e-KYC करण्यासाठी पैसे द्यावे लागतात. यातील पहिली केवायसी प्रक्रिया PM किसानच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन करता येते. याशिवाय, जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊनही KYC करता येते. PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 11 हप्ते देण्यात आले असुन या योजने अंतर्गत रजिस्टर्ड शेतकऱ्यांना सरकार कडून दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.