मेष: मेष राशीसाठी दिवस अनुकूल आहे. थांबलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामात सुधारणा झाल्याने उत्साह वाढेल. शांतता आणि संयमाचे धोरण फायदेशीर ठरेल. अवघड कामात यश मिळेल. कष्टाचे चीज होईल. व्यवसायात प्रगतीचे पाऊल पडेल, फक्त सकारात्मक राहा. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. आज वाणी मधुर ठेवल्यास कामे सहज पूर्ण होतील.
वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस समाधानकारक आहे. राजकीय क्षेत्रात कार्यरत असाल तर अधिक जबाबदाऱ्या खांद्यावर पडतील. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल, मात्र कामही वाढेल. व्यवसायातील नवीन करार प्रतिष्ठा वाढवतील. मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारत असल्याने गुंतवणुकीचा विचार करता येईल. रात्री कुटुंबासोबत वेळ घालवाल.
मिथुन: मिथुन राशीसाठी दिवस ठीकठाक आहे. मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीची शक्यता असल्याने सावध रहा. दिवसभर कामाची धावपळ राहील. नशिबाची साथ असली तरी प्रत्येक काम लक्षपूर्वक करा. मुलांच्या स्पर्धा परीक्षेतील यशामुळे आनंद आणि मान-सन्मान वाढेल. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल.
कर्क: कर्क राशीसाठी दिवस अत्यंत शुभ असून धनलाभाचे योग आहेत. काही प्रोजेक्ट जास्त वेळ घेऊ शकतात. कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. जुनी येणी वसूल होतील. एखादी चांगली बातमी मन प्रसन्न करेल. प्रवासाचे योग असून सकारात्मक अनुभव मिळतील. संध्याकाळी मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
सिंह: सिंह राशीसाठी दिवस लाभदायक आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. व्यवसायात नवीन करार किंवा भागीदारीचे प्रस्ताव येतील. निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. भांडवलाच्या बाबतीत सावध राहा. मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल. आत्मविश्वासाने पुढे जा, प्रयत्नांना यश मिळेल.
कन्या: कन्या राशीसाठी दिवस ठीक आहे. नोकरी व व्यापारातील प्रयत्नांना यश मिळेल. मुलांकडून समाधानकारक बातमी मिळेल. दुपारनंतर कायदेशीर वादात विजय मिळण्याची शक्यता आहे. शुभ कार्यांवर खर्च होईल, ज्यामुळे मान-सन्मान वाढेल. शिस्तबद्ध वागणूक ठेवल्यास सर्व कामे नीट पूर्ण होतील.
तूळ: तूळ राशीसाठी दिवस चांगला आहे. घरात आनंदी वातावरण राहील. प्रलंबित देणे-घेण्याची अडचण सुटेल. पुरेसा पैसा हातात आल्याने मन प्रसन्न राहील. विरोधक पराभूत होतील. प्रवासाचा योग पुढे ढकलला जाऊ शकतो. प्रेमसंबंध दृढ होतील, आपलेपणा आणि समजूतदारपणा जपा.
वृश्चिक: वृश्चिक राशीसाठी दिवस फारसा अनुकूल नाही. ताणतणाव वाढू शकतो. तब्येतीची विशेष काळजी घ्या. श्वसन किंवा रक्तासंबंधी त्रास जाणवू शकतो. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. मानसिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. कामात इतरांची साथ मिळेल.
धनु: धनु राशीसाठी दिवस अत्यंत शुभ आहे. ग्रहांची साथ लाभेल, त्यामुळे प्रगती होईल. व्यवसायात कडू-गोड अनुभव येतील, त्याकडे दुर्लक्ष करून काम सुरू ठेवा. पैशाशी संबंधित नवीन आव्हान पेलावे लागेल. मेहनतीचे फळ नक्की मिळेल. मानसिक समाधान प्राप्त होईल.
मकर: मकर राशीसाठी दिवस सकारात्मक आहे. कौटुंबिक व आर्थिक बाबतीत यश मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घ्याल. नशिबावर विसंबून न राहता सातत्याने प्रयत्न करा. परदेशी व्यवहारांना गती येईल. मेहनत केल्यास यश निश्चित आहे.
कुंभ: कुंभ राशीसाठी दिवस थोडा कठीण जाऊ शकतो. निरर्थक वाद आणि विरोधक वाढू शकतात. निर्णय घेताना सावध रहा. शक्य असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. खर्च वाढल्याने चिडचिड होऊ शकते, ती नियंत्रणात ठेवा.
मीन: मीन राशीसाठी दिवस फारसा अनुकूल नाही. मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. सासरच्या नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार टाळावेत. धार्मिक कार्यांवर खर्च वाढेल. व्यवसायात नवीन कामांना मुहूर्त मिळेल. नवीन बोलणी व करार होतील. पैशाची योग्य तजवीज करावी लागेल. नोकरीत बदल किंवा बदलीची शक्यता आहे.