लिव्हर शरीरातील सगळ्यात महत्वाचं अवयव आहे. ते शरीरातील अनेक कामात महत्वाची भूमिका बजावतं. पण आपल्याच काही चुकांमुळे ते खराब होतं. या चुकांबाबत आपल्याला माहीत नसतं. वेळ निघून गेली की नंतर लिव्हर ट्रांसप्लांटची वेळ येते. अशात लिव्हर चांगलं ठेवणं ही आपली जबाबदारी असते.
लिव्हर खराब होण्याची कारण
दारूचं जास्त सेवन केल्याने लिव्हर जास्त खराब होतं. हे एक कारण आहेच. पण असं अजिबात नाही की, फक्त दारू पिऊन लिव्हर खराब होतं. दारू न पिताही लिव्हर खराब होऊ शकतं. मात्र, आपल्या किचन मध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही लिव्हर चांगलं ठेवू शकता.
साखर घातक
पांढरी साखर म्हणजे रिफाइंड शुगर दारू पेक्षाही घातक आहे. साखरेचा वापर आपण विचार न करता वेगवेगळ्या गोष्टी मध्ये करतो. यामुळे लिव्हर मध्ये फॅट वेगाने जमा होण्यास मदत मिळते. ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या होते. लिव्हरवर फॅट जमा होण्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज म्हटलं जातं. ही समस्या झाली तर लिव्हरचं काम कमजोर होतं. इतकंच नाही तर गूळही साखरे इतकाच लिव्हरसाठी घातक आहे. अशात काही गोष्टींचं सेवन करून लिव्हर निरोगी ठेवू शकता.
हळद-दूध
शरीराची वेदना दूर करण्यासाठी बरेच लोक दुधामध्ये हळद टाकून सेवन करतात. झोपण्याआधी एक ग्लास गरम दुधात चिमुटभर हळद टाकून सेवन करावं. याने शरीर आतून साफ होतं. कारण हळदी मध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात.
आवळा आणि लिंबू पाणी
लिव्हरवरून दारू आणि साखर दूर करण्यासाठी आवळ्याचं सेवन करू शकता. यातील व्हिटॅमिन-सी मुळे लिव्हर साफ होतं. तसेच सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणीही पिऊ शकता. एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून सेवन केल्याने डायजेशन चांगलं होतं आणि लिव्हरही साफ होतं.
ग्रीन टी आणि ताजी फळ
लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे लिव्हर मधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी ग्रीन-टी चं सेवन करू शकता. यातील अँटी-ऑक्सिडेंटमुळे लिव्हर साफ होतं. त्याशिवाय रोजच्या आहारात ताज्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करावा. यात फायबर आणि इतरही पोषक तत्व असतात.
नारळ पाणी
नारळ पाण्यात भरपूर इलेक्ट्रोलाइट असतात. नारळ पाणी हे एक नॅचरल डिटॉक्स ड्रिंक मानलं जातं जे लिव्हरला हायड्रेट ठेवतं. सोबतच याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यासही मदत मिळते.
(सोशल मीडियावरून साभार)