shivajirao adhalrao patil

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

मुख्य बातम्या राजकीय

पुणे: शिरूर लोकसभेत खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार? अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघासाठी अडून असल्यामुळे शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांची अडचण झाली आहे. यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अजित पवार यांनी दबावतंत्र अवलंबल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागू शकतो? अन्यथा अजित पवार यांनी भाजपच्या प्रदीप कंद यांना अमोल कोल्हे यांच्या विरोधात रिंगणात उतरवू, असा पत्ता खुला केला आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थित दोन दिवसांपूर्वी बैठक झाली आहे. स्वतः आढळराव ही मुंबईत हजर होतेच. त्यावेळी अजित पवार यांनी हे दबावतंत्र अवलंबले आहे. अजित पवार यांच्या या दबावाला शिवाजीराव आढळराव पाटील बळी पडण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या बैठकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत चर्चा करू शकतात. कदाचित ते याबाबतची अप्रत्यक्षपणे घोषणा करण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.

शिवाजीराव आढळराव पाटील यांना येत्या काही तासांत तसा निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण दुसरीकडे अजित पवार यांनी आढळरावांच्या बाले किल्ल्यात अर्थात मंचरमध्ये चार मार्चला जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले आहे. त्या सभेत एकतर आढळरावांचा, नाहीतर प्रदीप कंद यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतो. लोकसभेची आचारसंहिता 15 मार्चच्या आधी कधी ही लागू शकते. तत्पूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण? यावर शिक्कामोर्तब करणे गरजेचे आहे. सध्या शिरूर लोकसभेच्या अनुषंगाने महायुतीत घडणाऱ्या राजकीय हालचाली पाहता, या आठवड्याभरात महायुतीचा उमेदवार ठरू शकतो. याच पार्श्वभूमीवर आज शिवाजीराव आढळराव पाटील बोलवलेल्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

दरम्यान, शिरूर मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे राखण्यासाठी महायुतीने चंग बांधला आहे. पुणे म्हाडाचे अध्यक्षपद हे राज्यमंत्र्यांच्या दर्जाचे आहे. त्यामुळेच शिवाजीराव आढळराव पाटील पत्ता कट केल्याचीही चर्चा सुरू आहे. म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर मात्र शिरूर मतदारसंघावर दावा करणाऱ्या आढळरावांची भाषा काहीशी नरमाईची झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याच्या मागे आपण ठाम राहू, त्याचा प्रचार करू अशी भूमिका आढळराव यांनी घेतली आहे. पण, आज काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पत्ता कट?

शिरूर लोकसभा! शिवाजीराव आढळराव पाटील नरमले…

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूकीबाबत फोडली डरकाळी…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

मोठा गौप्यस्फोट! आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात…

दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील

राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार: आढळराव पाटील

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…