crime

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कार चालक असलेल्या तिच्याच पतीविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचा निष्कर्ष तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी हि कारवाई केली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास नानाभाऊ इथापे (रा. गणेश पार्क, लोहगाव, पुणे) हे दि 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास त्यांची टोयोटा लिव्हा (एमएच 14 डीएन 4091) ही कार निर्वीकडून न्हावरेकडे चालवत होते. न्हावरे गावच्या हद्दीत सिताराम सात्रस यांच्या घराजवळ आल्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली.

या अपघातात चालक रामदास इथापे यांच्यासह त्यांच्या शेजारील सीटवर बसलेल्या पत्नी शोभा रामदास इथापे (वय 55) या गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान शोभा इथापे यांचा मृत्यू झाला. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान, या घटनेची नोंद सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र पुढील तपासात वाहन चालकाने रहदारी नियमांचे उल्लंघन करून हयगयीने, निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालविल्याचे निष्पन्न झाल्याने शिरुर पोलिसांनी मयताचे पती चालक रामदास इथापे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार निलेश बळवंत शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायदा कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावावर शोककळा; 11 के व्ही विद्युत तारेचा धक्का बसल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत