शिरुर तालुक्यातील विदयुत मोटार चोरी प्रकरणी दोन जण अटकेत

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजीतील शिनगरवाडीतील कुकडी नदीच्या काठावरून 2 विद्युत मोटारी चोरीला गेल्याची फिर्याद नाथाभाऊ शिनलकर व बाबाजी खामकर यांना शिरूर पोलिस स्टेशनला (दि. १५) ऑगस्ट२०२२ रोजी दिली होती. त्या अनुषंगाने तपास करत असताना टाकळी हाजीतील संशयित आकाश नतु साळुंके व भरत अनिल गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकड 1 चोरीची दुचाकी मिळून आली असून त्यांनी या 2 विद्युत मोटारी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, फिर्यादी नानाभाऊ देवराम सिनलकर व बाबाजी रामभाउ खामकर यांची कुकडी नदीवरील शेतीचे पाणी उपसा करण्यासाठी ठेवलेल्या एकुण टेक्मो कंपनीची १० एच. पी. व ७.५ एच. पी. च्या इलेक्टीक मोटारी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्यादी थिरूर पोलिस स्टेशन येथे दाखल होती. सदर गुन्हयाच्या कामी ६ साक्षीदारांकडे शिरूर पोलिस स्टेशनकडून तपास करण्यात आला. तसेच सदर घटनास्थळाचा पंचनामा दोन पंचासमक्ष करण्यात आला. तसेच ५ संशयितांच्या घरझडत्या घेण्यात आल्या होत्या.

सदर गुन्हयाचा तपास करत असतांना आरोपी आकाश नतु साळुंके (वय १९ वर्षे ) व भरत अनिल गायकवाड (वय १९) रा. बारहातेवस्ती, टाकळीहाजी, (ता. शिरूर) यातील हे आरोपी उचाळेवस्ती, टाकळीहाजी येथे हिरो कंपनीची एच एफ. डीलक्स मोटार सायकल एम. एच. १४ / ई. झेड. ८२६१, सह मिळुन आले.

सदर मोटार साकयलबाबत चौकशी केली असता सदरची मोटार सायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरची मोटार सायकल गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आली आहे व त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी मोटार चोरीतील गुन्हयातील शिनगरवाडी, टाकळीहाजी (ता. शिरूर) जि. पुणे गावच्या हद्दीतील कुकडी नदीकाठावरील इलेक्ट्रीक मोटारी चोरल्याची कबुली दिली आहे.

शिरूर पोलीस स्टेशन अंकित टाकळी हाजीऔट पोस्टच्या हद्दीत इलेक्ट्रीक मोटारी, केबल, वायरी, टुव्हीलर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने आरोपी यांनी अशा प्रकारे चोऱ्या केल्या असल्याची शक्यता असल्याने त्या अनुषंगाने सदर आरोपी यांचेकडे सखोल तपास करणे गरजेचे आहे.