हळदीच्या कार्यक्रमात वाद, महिलांवर व मुलावर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर येथील शांतीनगर परिसरात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. यामध्ये दोन महिलांवर तसेच एका अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी दीक्षा मोहन राखपसरे (वय 30, व्यवसाय – मजुरी, रा. शांतीनगर, शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास, शांतीनगर येथे प्रकाश विठठ्ठल लोंढे यांच्या घरासमोर वादाची ठिणगी पडली. या वादात दीक्षा राखपसरे, त्यांची सासू लिलाबाई लक्ष्मण राखपसरे व मुलगा श्रेयश यांना गंगा विठठ्ल लोंढे, प्रकाश विठठ्ल लोंढे व कैलास विठठ्ल लोंढे यांनी मारहाण केली. विशेषतः प्रकाश लोंढे याने श्रेयश या अल्पवयीन मुलाला काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक खेडकर हे करत आहे.शांतीनगर परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.