शिरूर तालुक्यात उसतोड कामगार न देता केली आर्थिक फसवणुक…

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील दत्तात्रय किसन गायकवाड रा. मलठण यांना गणेश बन्सी राठोड, लहु बढी चव्हाण यांनी त्यांना खात्रीने उसतोड कामगार पुरवितो असा विश्वास देवून उसतोड कामगारांना देण्यासाठी म्हणून वेळोवेळी त्यांच्याकडून ३१,६०००/रू. (अक्षरी एकतीस लाख साठ हजार) एवढी रक्कम नेवून कामगार न देता मोठी आर्थिक फसवणुक केली आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, जानेवारी २०२१ पासून आरोपी १) गणेश बन्सी राठोड, रा. तुपेवाडी तांडा, पो.बावणे पांगरी, ता. बदनापूर, जि. जालना. २) लहु बढी चव्हाण, रा. तुपेवाडी तांडा, पो.बावणे पांगरी, ता. बदनापूर, जि. जालना. यांनी आम्ही तुम्हाला खात्रीने उसतोड कामगार पुरवितो असा दत्तात्रय गायकवाड यांना विश्वास देवून उसतोड कामगारांना देण्यासाठी म्हणून वेळोवेळी त्यांच्याकडून ३१, ६०००/रू. (अक्षरी एकतीस लाख साठ हजार) एवढी रक्कम नेवून त्यांना उसतोड कामगार न पुरविता व त्यांच्याकडून घेतलेली रक्कम आज रोजी पर्यंत परत न देता विश्वासघाताने त्यांची ३१,६०,०००/ रू. (अक्षरी एकतीस लाख साठ हजार) एवढया रकमेची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहे.