शिरुर तालुक्यातील पती – पत्नी दोघेही झाले एकाच वेळी पोलिस दलात भरती

शिरूर तालुका

परीसरातून कौतुकाचा वर्षाव

शिरुर (अरुणकुमार मोटे): चांहोड (ता. शिरूर) येथील शेलार कुटुंबातील पती तुषार व पत्नी भाग्यश्री हे शेतकरी जोडपे जिद्द व चिकाटीच्या जोरावर एकाच वेळी पोलिस दलात भरती झाले आहे. त्यामुळे परीसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

काही झाल तरी पोलिस दलात भरती व्हायच या जिद्दीपोटी अथक प्रयत्न व कुटूंबाने प्रोत्साहन दिल्याने कांदा काढणी करत असताना त्यांना आंनदाची बातमी समजली. अखेरची मिरीट लिस्ट लागल्याने त्यात प्राविण्य मिळवून नवरा बायको एकाच वेळी पोलिस दलात भरती झाले आहे. त्यावेळी या शेतकरी कुटूंबात आनंदाचे अश्रू पहावयास मिळाले. या मुलाने आपल्या पत्नीला उचलून घेऊन कांद्याच्या शेतात आनंद उत्सव साजरा केला.

चांहोड (ता. शिरूर) येथे शेतकरी म्हतारबा शेलार यांचा मुलगा तुषार अन सुनबाई भाग्यश्री पोलिस भरती झाले आहेत. चांडोह येथील म्हतारबा शेलार यांचे कुटूंब हे गावाच्या विकासासाठी झटणारे कुंटूंब आहे. आई कुसूम शेलार ही पाच वर्ष सरपंच म्हणून त्यांनी अनेक विविध विकास कामात मोलाचे सहकार्य केले आहे. खेडे असणाऱ्या गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे काम त्यांनी केले. या गावात आजही एसटी येत नाही.

तुषारच लग्न भाग्यश्री बरोबर सन २०२० मध्ये पार पडल. फक्त पोलिस दलात भरती होयचे असा विचार तुषार आणि भाग्यश्री ने ठरविला होता. त्यांना दोघांना पोलिस भरतीचे वेध लागले होते. त्यासाठी तुषार ने गेली चार वर्षे खुप कष्ट घेतले आहे. दररोज असणारा व्यायाम शिवाय घर व शेतात असणारे काम याला फाटा देऊन या जोडप्याने फक्त पोलिस भरतीचे लक्ष ठेवले होते.

दरम्यान, वेळप्रसंगी घरातील अडचणी यामुळे त्यांना खुप त्रास झाला आहे. त्यावर मात करून त्यांनी पोलिस दलात यशस्विता मिळवता आली. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यावर पतीने पत्निला खांद्यावर उचलून घेऊन आनंद व्यक्त केला आहे.