वढू बुद्रुक येथे वीज पडून वृध्द दाम्पत्य जखमी, सुदैवाने चौदा वर्षांचा नातू बचावला

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे सोमवार (दि २९) मे जोरदार सुसाटयाचा वादळवारा सुटला होता.यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरु होता. त्यामुळे वढू बुद्रुक येथील शेतकरी उत्तम भंडारे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आणि नातू ओम हे तिघेही रानातून घरी येत असताना नातू ओम पळत घरी आला. परंतु उत्तम भंडारे आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई भंडारे घरी येत असताना अचानकपणे विज पडल्याने मोठा आवाज झाल्याने ते दोघेही बेशुद्ध पडले. विजेच्या आवाजाने लक्ष्मीबाई यांच्या कानाला इजा झाली असुन या अपघातात त्यांच्या कानाचा पडदा फाटला आहे. सुदैवाने चौदा वर्षीय नातू पुढे पळत आल्याने मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवित हानी झाली नसून लक्ष्मीबाई व उत्तम भंडारे यांची प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती पुतणे माऊली भंडारे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार वढू बुद्रुक येथील अनाजीचा मळा येथील शेतकरी कुटुंबातील आजी, आजोबा व नातू रानातून घरी येत असताना जोरदार पाऊस सुरू झाला यावेळी त्यांचा १४ वर्षीय नातू ओम हा पाऊस आला म्हणून घरी पळत आला. पण वृध्द आजी आजोबा मागे चालत येत असताना रानाच्या मधोमध आल्यावर नेमकी त्याचवेळी वीज खाली कोसळली. पण सुदैवाने विजेच्या खांबाच्या तारांवर वीज पडली त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. असून या अपघातात लक्ष्मीबाई उत्तम भंडारे या जखमी झाल्या आहेत. अचानक पडलेल्या विजेमुळे वृध्द दाम्पत्य घाबरले तसेच ते जागीच बेशुद्ध पडले.

यावेळी विजेच्या आवाजाने लक्ष्मीबाई भंडारे यांच्या कानाचा पडद्याला इजा झाली असून तो फाटला आहे. नातेवाईकांनी लक्ष्मीबाई भंडारे यांना वाघोली येथील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. या अपघातात लक्ष्मीबाई यांना जास्त भाजले असून उत्तम भंडारे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

सध्या या दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरीच उपचार सुरु असुन आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी वीज पडून जखमी झालेल्या या दाम्पत्याची घरी जाऊन आपुलकीने भेट घेत आरोग्याविषयी चौकशी करत काळजी करू नका, तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला यावेळी दिला. पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, वढू बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भंडारे, उद्योजक संतोष भंडारे उपस्थित होते.

वेळ आली होती पण काळ आला नव्हता…

काही दिवसांपूर्वी वादळी वारा आला आणि ढंगाचा मोठ्या प्रमाणात गडगडाट झाला. त्यावेळी उत्तम भंडारे यांच्या घरापुढील नारळाच्या झाडावर वीज पडली होती. तर आता घरामागील शेतात अंदाजे साठ ते सत्तर फुटावर वीज पडली असून यावेळी लक्ष्मीबाई भंडारे या जखमी झाल्या तर पती उत्तम भंडारे व ओम भंडारे हे तिघेही सुदैवाने व नशीब बलवत्तर असल्यामुळेच बचावले आहेत.