शिरुरमध्ये शासन आपल्या दारी उपक्रम राबवणार…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी ” हे अभियान राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. सदर अभियान जिल्हाधिकारी पुणे व उपविभागीय अधिकारी, उपविभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुका स्तरावर शिरुर नगर परिषद हॉल मध्ये मंगळवार (दि.३०) मे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेमध्ये पार पडणार आहे.

या सर्व शासकीय योजनांची निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येवून नागरीकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या अभियांनातंर्गत आयोजित शिबिरामध्ये शासनाचे महसूल विभाग, पंचायत समिती, नगर विकास विभाग, पोलिस विभाग, कृषी विभाग, कृषी विभाग पंचायत समिती, सार्वनिक बांधकाम विभाग, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग पंचायत समिती, जि.प. बांधकाम विभाग, सहकार विभाग, महिला व बालविकास विभाग, पशुवैद्यकीय विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, महावितरण विभाग, एस.टी. महामंडळ विभाग, पोस्ट ऑफीस व सर्व बैंक इत्यादी शासनाचे सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरीकांना शासनाचे विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देणे, या अभियानांतर्गत नागरीकाना विविध योजनांची माहिती पोहचवणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेणे, योजनेसाठी पात्र प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, याबाबतचे लाभ देण्यात येणार आहेत.

शिरूर तालुक्यात शासण आपल्या दारी ही शासणाची अतिशय महत्वाकांक्षी योजणा यशस्वीपणे राबवत आहे. नागरीकांचा याला चांगला प्रतिसाद लाभत असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे जलद गतीने मार्गी लागलेली आहे. अजून कामे प्रलंबित राहीलेल्या नागरीकांनी शिरूर नगरपरीषदेत (दि. ३०) मे रोजी उपस्थित राहून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहण शिरूरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.