शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील दोनशे वर्षाहुन अधिक काळ विश्वासहर्ता असलेल्या एस के खांडरे भैय्या सराफ (सराफ ॲण्ड ज्वेलर्स) या प्रख्यात सुवर्णपेढीच्या दुमजली इमारतीतील नव्या वास्तूतील सुवर्णदालनाचा भव्य उदघाटन सोहळा नुकताच प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते पार पडला. शिरुर शहरात प्रथमच असे भव्य दुमजली सुवर्णदालन झाले असुन या शुभारंभ प्रसंगी अनेक मान्यवरांनी व नागरीकांनी दुकानास भेट देउन शुभेच्छा दिल्या.
देशाचे प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल तसेच त्यांच्या पत्नी दिना धारीवाल, मुलगी साक्षी धारीवाल तसेच शिरुर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार, पारनेरचे आमदार निलेश लंके, माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके ,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे , घोडगंगा कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, माजी नगरसेवक विजय दुगड, नितीन पाचर्णे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच नागरिकांनी यावेळी या दुमजली सुवर्णदालनास भेट दिली.
गेल्या चार पिढ्यांची परंपरा असलेल्या दोनशे वर्षाहुन अधिक काळ विश्वासहर्ता असलेल्या या सुवर्णदालनाचे नविन दुमजली जागेत स्थलांतर झाले आहे. या निमित्ताने प्रत्येक खरेदीवर आकर्षक ऑफर देण्यात आली आहे. यावेळी प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी खांडरे परिवारास या निमित्ताने शुभेच्छा दिल्या व शहरात दुमजली सुवर्ण दालन झाल्याबद्दल नागरीकांना अनेक नाविन्य पुर्ण दागीने पहावयास मिळतील असे ही ते म्हणाले.
एस के खांडरे भैय्या सराफ या दुकानात सोने व चांदी तसेच खरे हिऱ्याचे दागीने या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. सर्व पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत शंतनु खांडरे, माजी उपनगराध्यक्षा अलका खांडरे, शिवसेवा मंडळाचे ट्रस्टी सुरेश खांडरे, सतिष खांडरे, नितीन खांडरे, जितेंद्र खांडरे, तुषार खांडरे, श्रीकांत खांडरे आदीनी केले.