शिरुर येथील एस के खांडरे भैय्या सराफ सुवर्णदालनाचे प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते उदघाटन

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील दोनशे वर्षाहुन अधिक काळ विश्वासहर्ता असलेल्या एस के खांडरे भैय्या सराफ (सराफ ॲण्ड ज्वेलर्स) या प्रख्यात सुवर्णपेढीच्या दुमजली इमारतीतील नव्या वास्तूतील सुवर्णदालनाचा भव्य उदघाटन सोहळा नुकताच प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते पार पडला. शिरुर शहरात प्रथमच असे भव्य दुमजली सुवर्णदालन झाले असुन या शुभारंभ प्रसंगी अनेक मान्यवरांनी व नागरीकांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील मलठण येथील सोसायटीमध्ये डिजिटल सेवा केंद्राचे उद्‌घाटन

कान्हूर मेसाई (सुनील जिते) सध्याचे युग हे डिजिटल असून सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाइन असणाऱ्या विविध योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन सहायक निबंधक अरुण साकोरे यांनी मलठण या ठिकाणी केले. मलठण (ता.शिरुर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र, डिजिटल सेवा केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.   याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाष […]

अधिक वाचा..

वृक्षतोडीमुळे पंचायत समितीचे सुशोभिकरणाचे उदघाटन वादाच्या भोवऱ्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीचे सुशोभिकरण या कार्यालयातील गटविकास अधिकाऱ्यानी केलेल्या मोठ्या वृक्षतोडीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुशोभिकरणाच्या उद्घाटनाचा सोहळा (दि. २८) मार्च रोजी होणार होता. कार्यक्रमाची जय्यत तयारीही झाली. कोनशिलाही मोठ्या थाटात लावण्यात आली होती. परंतू अधिकाऱ्याच्या वृक्षतोडीच्या कारनाम्यामुळे मुख्य कार्यकारी आधिकारी, आमदार, खासदार व मान्यवर न आल्याने हा उद्धाटनाचा कार्यक्रम होऊ शकला […]

अधिक वाचा..

दरेकरवाडीतील उद्घाटन फलक चोरणाऱ्यावर गुन्हे दाखल करा…

ग्रामपंचायत सदस्याची ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली असताना सदर कामाचे दोन वेगवेगळे भूमिपूजन होऊन तीन वेगवेगले फलक लावण्यात आले. मात्र ग्रामपंचायतने प्रथम लावलेला फलक चोरीला गेल्याने गायब झालेले उद्घाटन फलक चोरणाऱ्याची चौकशी करुन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याची मागणी […]

अधिक वाचा..

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त आयोजित परिषदेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यासाठी भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. आज मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दोन […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास शाखेचे उदघाटन

शिक्रापूर (शशेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे नागरिकांना कायद्याची, शासकीय नियमांची माहिती मिळावी तसेच शासकीय व खाजगी कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधी आवाज उठवता यावा यासाठी नुकतेच भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास शाखेचे उदघाटन करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचे पुजन करुन भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास शाखेचे उद्घाटन करण्यात आले. […]

अधिक वाचा..