आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानच्या महाराष्ट्र राज्य “प्रसिद्धीप्रमुख” पदी जिजाबाई दुर्गे

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महाराष्ट्र सरकार मान्यताप्राप्त आणि आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेली ISO मानांकन असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रसिद्धीप्रमुखपदी जिजाबाई दुर्गे, राज्य महिला सहसचिवपदी सुजाता रासकर आणि राज्य महिला महासचिवपदी बेबी पिंपरकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षपदी डॉ सुनीता पोटे यांची निवड करण्यात आली. माळशेज घाट (जि. ठाणे) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हॉल येथे रविवार (दि 16) रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक देवा तांबे यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

शिरुर तालुक्यातील निमोणे येथील माजी आदर्श सरपंच जिजाबाई सुरेश दुर्गे यांची आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला “प्रसिद्धीप्रमुखपदी”, तर श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण गावच्या सुजाता रासकर यांची राज्य महिला “सहसचिवपदी” आणि गव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका बेबी सुदाम पिंपरकर यांची राज्य महिला “महासचिवपदी” नियुक्ती करण्यात आली. तसेच शिरुर येथील मीरा नर्सिंग होमच्या डॉ सुनीता संतोष पोटे यांची पुणे जिल्हा महिला “अध्यक्ष” पदी निवड करण्यात आली.

या सर्व नवनिर्वाचित सदस्यांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानचे संस्थापक देवा तांबे, राष्ट्रीय सरचिटणीस मेहबूब पैठणकर, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख संजय बोर्गे, पोलिस निरीक्षक प्रसाद मांढरे, पोलीस उपनिरीक्षक संसारे, महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश उघडे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे युवा सचिव करुणा गगे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केल. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.