नियमित कर्जफेड करणारे अनेक शेतकरी अजूनही प्रोत्साहनपर

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): ग्रामपंचायत निवडणूकीच्या आचार संहितेमुळे 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान रखडल असून रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?याकडे पुणे जिल्हयासह शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन पर ५०, ०००रु. देण्याचा दृष्टीने मागील ठाकरे सरकारने अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. निर्णय ऐतिहासिक होता. मात्र ठाकरे सरकारला याची अंमलबजावणी करता येणे शक्य झालं नाही.शेवटी आता नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. प्रोत्साहनपर अनुदानाचा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यात पार पडला असून पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ५० हजार रुपयांपर्यंतच प्रोत्साहन पर अनुदान मिळाले आहे.

मात्र दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहन पर अनुदानाला आचारसंहितेचे ग्रहण लागल आहे. खरं पाहता राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका प्रगतीपथावर आहेत. यामुळे अनुदानाची दुसरी यादी खोळंबली आहे. पुणे जिल्ह्यात देखील निवडणुका आहेत यामुळे अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी लांबणीवर पडली आहे.

येत्या पंधरा दिवसात म्हणजे ग्रामपंचायत निवडणुका पार पाडल्यानंतर अनुदानाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. निश्चितच गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रोत्साहन पर अनुदानाचा प्रश्न निकाली काढला गेला असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अनुदान मिळायला सुरुवात झाली होती.ज्या शेतकरी बांधवांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे अशा देखील काही शेतकरी बांधवांना अजून याचा लाभ मिळू शकलेला नाही.

मात्र लवकरच या शेतकऱ्यांना देखील लाभ दिला जाणार असून उर्वरित शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात अनुदान मिळणार आहे. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने प्रोत्साहन अनुदानास उशीर होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. एकंदरीत ग्रामपंचायतचा निवडणुकीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत असून बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.