कोंढापुरी येथील गरीब कुटुंबातील मानसी यादव ची उतुंग भरारी राष्ट्रीय पातळीवर ब्रांझ पदक 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): कोंढापुरी येथील मानसी यादव हिने आंतरराष्ट्रीय कॉलेज स्पर्धेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर भोपाळ येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळून ब्रांझ पदक मिळवले. कोंढापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामविकास फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसमोर मानसीने आपल्या स्पर्धेमागील यशाचे गुढ उकलले अभ्यासाबरोबरच तिला दहावीतही 90 टक्के गुण मिळाले याविषयी समाधान व्यक्त केले.

मानसी यादव चे मुळगाव चिखर्डे ता. बार्शी जि.सोलापूर असुन तिचे प्राथमिक शिक्षण खराडी येथील सुंदराबाई मराठी शाळेत तर माध्यमिक शिक्षण वाघोली येथील BJS शाळेत आणि सध्या ती BJS मध्येच उच्च माध्यमिक शिक्षण घेत आहे. मानसीची आई गृहिणी तर वडील वेल्डर आहेत. त्यामुळे तिची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही तिने प्रतिकुल परिस्थितीत मोठे यश मिळविले आहे. यावेळी रामेश्वर ढाकणे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सांगितले की इतर विद्यार्थ्यांनीही मानसी प्रमाणे यश मिळवायचे असेल तर मोबाईल पासून दूर राहणे हा एकच उपाय आहे. तसेच मैदानी खेळाचा पुरेपूर आनंद घ्यावा, असे मत व्यक्त केले.

यावेळी कोंढापुरी गावचे उपसरपंच सुनील गायकवाड, अखिल ग्राहक पंचायतचे प्रांत सचिव धनंजय गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य राहुल दिघे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुदाम लंघे, संभाजी वाळके, लालासाहेब जाधव,विनायक पडवळ अनिल महाजन, उत्तम हुलगुंडे, सौरव नवसुपे, राजू वेताळ, नीता पडवळ, संगीता तिरखुंडे, मीना कळमकर, मनीषा वाळके हे सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमात धनंजय गायकवाड, राहुल दिघे, स्वप्नील लवांडे, बापूसाहेब काकडे यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या मुलांना शुभेच्छा दिल्या. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही मानसी प्रमाणेच आपले व आपल्या गावाचे, आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करावे अशी आशा व्यक्त केली.