शिक्रापूरमध्ये पोलीस निरीक्षकांची तत्परता; रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीवर नियंत्रण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील चाकण चौकात गणेशोत्सव, शनिवार-रविवारची सुट्टी आणि मराठा मोर्चामुळे दोन तीन दिवसांपासून ठप्प झालेली वाहतूक शनिवारी शिक्रापूर परिसरात शिगेला पोहोचली. पुणे–नगर महामार्गावर मालवाहतूक व प्रवासी वाहनांची प्रचंड कोंडी झाल्याने नागरिक हैराण झाले होते.

या बिकट परिस्थितीत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी स्वतः मैदानात उतरत वाहतूक व्यवस्थापनाची सूत्रे हाती घेतली. रस्त्यावरच उभे राहून स्पीकरद्वारे सूचना देत, वाहनचालकांना मार्गदर्शन करत आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करून त्यांनी काही तासांतच महामार्गावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी केला. या धडाकेबाज पुढाकारामुळे वाहने सुरळीत धावू लागली. नागरिक आणि वाहनचालकांनी पोलिसांच्या या तत्पर सेवेला दाद देत सोशल मीडियावरही कौतुकाचा वर्षाव केला.

स्थानिक नागरिकांच्या शब्दांत

“ऑफिसमध्ये बसून आदेश देणं एक वेगळी गोष्ट आहे, पण पी आय साहेब स्वतः रस्त्यावर उतरले आणि शिस्त लावली; हीच खरी गणेशसेवा आहे.