marvel-empire

नागरीकांनो सावधान! शिरूरमध्ये होतेय बोगस एन.ए.प्लॉटची विक्री?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर-गोलेगाव रोडवरील शिरूर नगर परिषद हद्दीत माव्र्हल एम्पायर सोसायटीत गट नं . ३०९ / १ मध्ये क्षेत्र २ हेक्टर ४८ गुंठे असून या जमिनी बाबत कोर्टामध्ये दावा प्रलंबित आहे. तरीही या गटातील तब्बल ५०पेक्षा प्लॉट विक्री केले आहे व आजही विक्री होत आहे. खरेदीखत होताना एन.ए. ऑर्डर, ले आऊट जोडले जात नाही. यामध्ये नागरीकांची मोठी फसवणुक होत असून नागरीकांनी कागदपत्रे तपासूनच प्लॉट खरेदी करावेत.

या गटाला नियमबाह्यरीत्या बिनशेती परवानगी दिल्याप्रकरणी बिनशेती आदेश रद्द करण्याकरता परशुराम भागचंद पाचर्णे यांनी अपिल दाखल केले आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी हरेश सुळ यांनी या मिळकतीबाबत चौकशी करून स्वयंस्पष्ठ अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश शिरूर तहसिलदार यांना दिले आहे. सदर गट नं. ३०९/१ क्षेत्र २ हे. ४८ आर या नगरपालिका हद्दीतील गट नंबरचा रेखांकन नकाशा मंजूर करताना सदर रेखांकनामध्ये दर्शविण्यात आलेला ओपन प्लॉट हा आयताकृती किंवा चौकोनी आकाराचा असणे बायलॉजप्रमाणे आवश्यक असताना सदर ले-आऊट नं. पत्र. सशा.जाक्र.२४०५/ २०२० दि. २०/१०/२०२० चे अंतिम रेखांकनामध्ये ओपन स्पेस प्लॉट नं. २ याची रुंदी १७.६१ मी. दर्शविली असून लांबी ८३.२६ अशी दर्शवून त्रिकोणी आकाराचा ओपन स्पेस ठेवलेला आहे. सदरचा ओपन स्पेस हा रुंदीचे अडीच पट लांबीप्रमाणे दर्शविणे बायलॉजप्रमाणे आवश्यक असताना व तो चौकोनी आकाराचा किंवा आयताकृती आकाराचा दर्शविणे बंधनकारक असताना सदर ले-आऊटमध्ये सदरचा ओपन स्पेस ७५२.३७ स्क्वे.मी. चा त्रिकोणी आकाराचा चुकीच्या पध्दतीने बेकायदेशीर ओपन स्पेस प्लॉट दर्शविला असतानाही सदरचे प्लॉटला नगरपरिषद अभियंता व मुख्याधिकारी यांनी चुकीच्या पध्दतीने अंतिम मंजूरी दिलेली आहे.

सदर गट सुमारे ६ एकरापेक्षा जास्त असल्याने सदरचा प्लॉट बिनशेती करणेकामी तयार करण्यात आलेला ले-आऊटमध्ये १५ टक्के ॲमिनीटीज स्पेस दर्शविणे आवश्यक व गरजेचे असताना सदर ले-आऊटमध्ये एकूण क्षेत्र २ हे. ४८ पैकी १५ टक्के अमिनीटी न दर्शविता केवळ १०७३.४१ स्क्वे.मी. म्हणजे केवळ ५ टक्केच अॅमिनीटीज स्पेस दर्शविला असताना सदरचा बेकायदेशीर नकाशा ले-आऊट नगरपरिषद यांनी चुकीच्या पध्दतीने मंजूर केलेला आहे. सदरचा ले-आऊटला मंजूरी देताना नगरपरिषद अभियंता व मुख्य अधिकारी यांनी सदर ले-आऊटमध्ये किती क्षेत्र रस्त्यामध्ये बाधित आहे याचा कोणताही तपशील ले-आऊटमध्ये न दर्शविता सदरचे पध्दतीने अंतिम मंजूरी दिलेली आहे. ले-आऊटला चुकीच्या चुकीच्या पध्दतीने व नगरपालिकेचे बायलॉजमध्ये दर्शविलेल्या नॉर्मस्प्रमाणे ओपन स्पेस, ॲमिनीटी क्षेत्र न दर्शविता कमी प्रमाणात अँमिनीटी ओपन स्पेस दर्शविला असतानाही सदरच्या चुकीच्या ले- आऊटला अंतिम मंजूरी दिली असल्याने सदरचे कृत्य हे बिनशेती परवानगी रद्द होण्यास पुरेसे आहे.

नगरपरिषद शिरुर यांनी गट नं. ३०९/१ चा चुकीचा ले-आऊट मंजूर करुन तहसिलदार यांनीही सदरच्या चुकीच्या ले-आऊटनुसार बिनशेती आदेश पारीत केला आहे. तसेच सदरच्या चुकीच्या आदेशानुसार गट नं. ३०९/१ चे तालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांचेमार्फत चुकीच्या पध्दतीने पोटहिस्से करुन ७/१२ सदरी अंमल दिलेला आहे. त्यामुळे संबधित आधिकाऱ्यांची चौकशी होऊन चुकीच्या पद्धतीने बिनशेती आदेश रद्द करण्याची मागणी परशुराम पाचर्णे यांनी केली प्रांत आधिकाऱ्याकडे केली आहे.

चौकशीसाठी लागतोय विलंब…
या चौकशीसाठी महसुल प्रशासणाकडून दिरंगाई होत असून बडे मासे या प्रकरणात अडकणार आहे. या प्रकरणामुळे अनेक नागरीकांची फसवणुक झाली असून त्यांना न्याय मिळणे अपेक्षित आहे.

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात चुलती व पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ

जुन्नर तालुक्यातील खून प्रकरणी शिरूर तालुक्यातील एकाला अटक…

शिरुर; घोडनदीत रस्सीने बांधून टाकलेला अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलले…

शिरुर तालुक्यात हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी करत वृद्ध दाम्पत्याला गंभीर मारहाण

शिरुर येथील डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि अत्याधुनिक उपचारामुळे असाध्य आजारावर रुग्णाने केली मात