शिक्रापुर येथे डॉ रामचंद्र देखणे यांच्या आठवणींना शोकसभेद्वारे उजाळा

मुख्य बातम्या

शिक्रापुर (शेरखान शेख) शिरुर तालुक्याचे सुपुत्र संत साहित्याचे गाढे अभ्यासक, बहुरुपी भारुडकार कै. डॉ. रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरुर शाखेच्या वतीने शोकसभेचे आयोजन सिद्धीविनायक पब्लिक स्कूल मलठण फाटा सायकर मळा शिक्रापूर येथे करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते देखणे यांच्या प्रतिमेला पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपाली शेळके यांनी केले.

डॉ. रामचंद्र देखणे हे कृतिशीलता असणार अद्भुत व्यक्तीमत्व होते. शिरुर शाखेच्या वतीने साहित्य क्षेत्रातील लोककलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना डॉ रामचंद्र देखणे यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येईल, तसेच देखणे यांनी भारुडाच्या माध्यमातून केलेले समाज प्रबोधन कायमच जनतेच्या स्मरणात राहील.त्यांनी केलेले लोक जागृतीचे कार्य कधीच विसरता येणार नाही.त्यांचं साहित्य क्षेत्रातील कार्य महाराष्ट्रभर जरी असलं तरी त्यांचे मूळ गाव शिरुर तालुक्यातील कारेगाव हे आहे तेथील ग्रामस्थांनी मनावर घेऊन त्यांचे स्मारक उभारले तर मी स्वतः आर्थिक मदत करेल त्यांची आठवण महाराष्ट्रात कायम स्मरणात राहीलच परंतु जन्मगावी राहण्यासाठी ग्रामस्थांनी देखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी शोकसभेच्या वेळी केले.

यावेळी महावितरणाचे रामेश्वर ढाकणे, “शिरुर तालुका डॉट कॉम” चे संपादक तेजस फडके,सुखदेव राक्षे, मिना गवारे, मनिषा धुमाळ, तुकाराम भगत, बाबुराव सोकोरे, कारेगावचे उपसरपंच संदीप नवले, सीमा मोहिते, विक्रम फडतरे, नवनाथ डफळ, राजश्री खामकर आदीनी डॉ. देखणे यांच्या कार्याचा उल्लेख करुन श्रंध्दाजली वाहिली. शिरुर माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनीही मोबाईलद्वारे आपला शोक संदेश दिला.

यावेळी परिषदेचे कोषाध्यक्ष बाळासाहेब शेळके, मनिषा सायकर, मनोहर परदेशी, खंडेराव तनपुरे, “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या उपसंपादिका किरण पिंगळे, दताञय धुमाळ, दिलीप चातुर, माणिकराव आढाव, मारुती दसगुडे, संजय सुर्वे, सुखदेव राक्षे, वैशाली बांगर, रोहिणी डफळ, रेखा कळमकर, सुषमा गायकवाड, सुरेश काळोखे, ज्ञानेश ढमढेरे, नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य तसेच समाजशीलचे जेष्ठ पत्रकार राजाराम गायकवाड आदी मान्यवर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाबळ शाळेच्या शिक्षिका नाट्य परिषदेच्या सदस्या विजया कदम यांनी तर आभार नाट्य परिषदेच्या सदस्य वैशाली थिटे यांनी मानले. पसायदानाने या शोकसभेची सांगता झाली.