रामलिंग महीला उन्नतीच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) रविवार (दि 9) रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रामलिंग येथील भैरवनाथ मंदिरात देवीची आरती करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. ग्रामीण भागातील महिलांना नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा या दिवशी एकत्र येऊन आनंद घेता येतो, एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण होते. यावेळी महिलांनी नऊवारी साडी परिधान करुन दांडिया खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी गावातील सर्व जेष्ठ महिला, युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी देवीला नेसवण्यात आलेल्या साड्यांचे परीसरातील गरीब महिलांना वाटप करण्यात आले.

रामलिंग येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन मसाला दुध पिण्याचा आनंद घेतात. याचे आम्हाला समाधान मिळते. कोजागिरीच्या कार्यक्रमानिमित्त शिरुर येथील आदिशक्ती महीला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, डॉ. वैशाली साखरे, सविता बोरुडे ह्या उपस्थित होत्या. यावेळी या सर्वांचा सन्मान करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अभिजित कर्डीले यांनी सर्व महिलांसाठी दूध उपलब्ध करुन दिले . यावेळी स्व. गणेश गौतम घावटे पाटील युवा मंचचे अध्यक्ष मंगेश घावटे पाटील यांनी त्यांचा सन्मान केला.

यावेळी कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित सर्व महिलांचे रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी आभार मानले.