पुरस्कार मिळाल्याने काम करण्यास प्रेरणा मिळते; विशाखा गायकवाड

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत असुन सगळ्याच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. एखाद्या क्षेत्राचा अपवाद वगळता सगळ्याच ठिकाणी महिला सक्षमपणे स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे येत यशस्वी झाल्या आहेत. तुम्ही दिलेल्या पुरस्कारामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन विशाखा गायकवाड यांनी केले.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील कै. रामभाऊ गोपाळा फंड स्मृती वाचनालय आणि मंगलमूर्ती वुमन केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणगावातील विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांना नवरात्रीनिमित्त पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कार वितरण प्रसंगी त्या अध्यक्ष म्हणुन उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी महिला कामगारांचे प्रश्न, महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी तसेच महिलांना स्वतः च्या स्वरक्षणासाठी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर, उपसरपंच स्वाती शेळके, माजी सरपंच गायत्री चिखले, ब्रह्मकुमारी वेदिका यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला श्री महागणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त नारायण पाचुंदकर, ग्रंथालय संघाचे शिरुर तालुकाध्यक्ष विवेकानंद फंड, माजी उपसरपंच सुजाता लांडे, चंद्रभागा पाचुंदकर, मंगलमूर्ती वूमन केअर फाउंडेशनच्या संस्थापिका नारायणी फंड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मिळालेल्या पुरस्काराच्या मानकरी पुढीलप्रमाणे 

1) नीलम श्रीकांत पाचुंदकर

2) ज्योती मानसिंग पाचुंदकर

3) सुनंदा संजय शेळके

4) संगीता दत्तात्रय भुजबळ

5) सारिका तुषार पाचुंदकर,

6) रंजना महादू फंड,

7) अनिता राजेंद्र बांदल,

8) सुवर्णा चिमाजी खेडकर

9) डॉ. प्रियंका बाळासाहेब देवकर

10) विनिता नितीन देव

11) विशाखा नारायण पाचुंदकर

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश माळी यांनी तर प्रास्ताविक श्रावणी फंड हिने मांडले. यावेळी रांजणगाव मधील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.