शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस महासंचालक पदक प्रदान

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना आज (दि 1) मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते पोलिस महासंचालक पदक देण्यात आले. पोलिस दलात सलग 28 वर्ष सातत्याने चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी हवेली येथील लोणीकंद पोलिस स्टेशन, तसेच रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन आणि सध्या ते शिरुर पोलिस स्टेशन येथे कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांनी मुंबई शहर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, वाशिम जिल्हा इत्यादी ठिकाणी सलग 28 वर्ष पोलिस दलात नोकरी करताना सातत्याने चांगली कामगिरी करत अनेक गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास केला आहे. तसेच मागील वर्षी शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्र येथे दरोडा पडला होता. त्या दरोड्याचा उत्कृष्ट तपास करुन आरोपीना अटक करत बँकेची रोकड व दागिने हस्तगत केले होते. त्यामुळे या कामगिरीसाठी त्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले होते.

आज महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात सुरेशकुमार राऊत यांना पोलिस महासंचालक पदक प्रदान करण्यात आला. त्यानंतर शिरुर तालुक्यातील विविध मान्यवरांनी सोशल मीडियावर राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.