grahak-panchayat

ग्राहक पंचायत पुणे जिल्हा या संस्थेचे उद्घाटन!

रांजणगाव गणपती (अरुणकुमार मोटे): रांजणगाव महागणपती सभागृहामध्ये ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या राज्य व्यापी नवीन संस्थेचा निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला आहे. ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या विचाराने व सोबत काम करून प्रेरित होऊन सामाजिक कार्यकर्ते अशोक रावसाहेब भोरडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी […]

अधिक वाचा..
gram-panchayat-election

शिरुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीत कही खुशी कही गम; विजयी उमेद्वारांची नावे पाहा…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे निकाल आज (सोमवार) लागले असून, अनेक ठिकाणी प्रस्थापितांनी आपले गड राखले आहेत. काही ठिकाणी प्रस्थापितांना पराभव स्वीकारावा लागला. शिरुर तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव ग्रामपंचायत मध्ये मंगलमुर्ती ग्रामविकास पॅनलचे 14 तर विरोधी पॅनलचे 2 आणि 1 अपक्ष उमेदवार निवडून आला. रांजणगाव मध्ये अटीतटीच्या लढतीत शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे […]

अधिक वाचा..
Mahaganpati

महागणपती मुक्तद्वार दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा: स्वाती पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव गणपती येथील भाद्र्पद गणेशउत्सवा निमित्त रांजणगाव देवस्थान ट्रस्ट तर्फे १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर पर्यंत महा गणपतीस मुक्तद्वार दर्शन सुरु राहणार आहे. या काळात श्रींच्या मुर्तीस हात लावून दर्शन घेता येणार असून, मुर्तीस जलाभिषेक करता येणार आहे, याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रांजणगाव देवस्थानच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी […]

अधिक वाचा..
Shirur-gold

शिरूर तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत सोनसाखळी केली परत…

रांजणगाव गणपतीः सामाजिक बांधिलकी जपत वृंदावन वॉशिंग सेंटर चे मालक सौरभ रघुनाथ पाचुंदकर यांनी हरवलेली सोनसाखळी परत केल्यामुळे आभार मानले आहेत. रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे दिनांक 7/8/2023 रोजी MH 12 5869 ही गाडी सायंकाळी साडेचार च्या सुमारास वृंदावन वॉशिंग सेंटर येथे पञकार अर्जुन शेळके हे गाडी वॉशिंग साठी देऊन साईटला थांबले होते. गाडी वॉशिंग […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तालुका कार्यकारिणी निवड संपन्न 

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे):  रविवार (दि. ६ ऑगस्ट 2023 रोजी रांजणगाव गणपती येथील मारुती मंदिरामध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या संघटनांची संयुक्त बैठक पार पडली.बैठकीसाठी विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत काळे (जिल्हा अध्यक्ष) ,संतोष खामकर (विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री) , अजिंक्य तारू (शिरूर प्रखंड संयोजक), ऋषी न-र्हे (सहसंयोजक), विजय थोरात, संदेश साळुंखे हे […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे मातृ-पितृ कृतज्ञता व अभिष्टचिंतन सोहळा

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथे उद्या (दि 16) रोजी पवार कुटुंबियांच्या वतीने सुखकर्ता लॉन्स येथे मातृ-पितृ कृतज्ञता व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन त्यानिमित्त समाजप्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या किर्तनाचे दुपारी 11 ते 1 च्या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. रांजणगाव गणपती येथील प्रसिद्ध गाडामालक पवार कुटुंबातील बबनराव धोंडिबा पवार […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांचे निधन

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील दत्तात्रय खंडू जाधव (वय 49) हे रांजणगाव गणपती येथील बसस्थानकाकडुन मंदिराकडे पायी चालत येत असताना त्यांना पाठीमागून टेम्पोने धडक दिली होती. त्यानंतर त्यांना शिरुर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. रांजणगाव गणपती येथील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात दत्तात्रय जाधव यांचे मोलाचे योगदान […]

अधिक वाचा..
Mahaganpati

महागणपती मंदिरात मुक्तद्वार यात्रेचे आयोजन…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील श्री महागणपती मंदिरामध्ये रविवारपासून (ता. २८) साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाद्रपद गणेशोत्सवाची तयारी चालू आहे. महागणपती मंदिरात रविवार (ता. २८) ते बुधवार (ता. ३१) मुक्तद्वार यात्रेचे आयोजन केले आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती देवस्थानने दिली. श्री […]

अधिक वाचा..

काय ते देवस्थान, काय त्यांचा कारभार, सगळं कसं अजबच हाय…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील महागणपती मंदिरासमोर बुधवारी (ता. ६) रोजी सकाळी ११ च्या सुमारास गोरक्ष शंकर भुजबळ या व्यक्तीचा अपघात झाला. हाकेच्या अंतरावर रांजणगाव देवस्थानची ट्रस्टची अँब्युलन्स उभी असताना ती वेळेवर उपलब्ध न झाल्याने सदर अपघातग्रस्त व्यक्तीला खाजगी वाहनातून उपचारासाठी दवाखान्यात न्यावे लागले. परंतु, रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवस्थान ट्रस्टची अँब्युलन्स कदाचित […]

अधिक वाचा..
dead

रांजणगावमध्ये टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू; तर एक जखमी…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील महागणपती मंदिराच्या समोर बुधवारी (ता. ६) रोजी टँकरने धडक दिल्याने गोरक्ष शंकर भुजबळ (वय 55, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात भुजबळ यांचे नातेवाईक भीमा हरिभाऊ गोरे (रा. वाडेगव्हाण, ता.पारनेर, जि.अहमदनगर) हे जखमी झाले आहेत. याबाबत विश्वास गोरक्ष भुजबळ यांनी फिर्याद दिल्याने टँकर […]

अधिक वाचा..