अनेक घाट गाजवणाऱ्या बैलाच्या मृत्यूनंतर घातला विधिवत दशक्रिया विधी

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे, नगर जिल्हातील बैलगाडा घाटाचा मानकरी व शिस्तीचा बादशहा ठरलेला सविंदणे (ता. शिरुर) येथील भिमा लंघे, महेश डोके यांच्या पिष्ठण (भैरवनाथ) या बैलाचा वयाच्या साऱ्या लंम्पी या रोगाने दुर्देवी मृत्यू झाला आहे.

बैलाच्या निधनाने लंघे कुटुंबाला मोठे दुख झाले आहे. अनेक बैलगाडा घाट या बैलाने गाजवले असून अनेक बक्षिसे पटकावली आहे.कुटुंबातील सदस्याप्रमाणे या बैलाचे संगोपन लंघे कुटुंबाने केले होते. या बैलाला १० लाखाला मागणीही होत होती. परंतू बैलाच्या चांगल्या कामगिरीमुळे व प्रेमापोटी विक्री केली नव्हती. बैलाच्या निधनाने बैलाच्या अनोख्या प्रेमापोटी विधिवध श्राद्ध घालून त्याचा दशक्रिया विधी सविंदणे येथे संपन्न करण्यात आला. या बैलाच्या पुतळ्याची गावातून मिरवणुक काढून लंघे यांच्या घरासमोर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

दशक्रिया प्रसंगी विलास महाराज वाघ , केंदूर यांची प्रवचन सेवा करण्यात आली.व भोजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. याप्रसंगी विविध नेत्यांनी आपल्या भाषणातून पिष्ठणला भद्धांजली वाहीली. यावेळी राजूशेठ गावडे, डॉं. सुभाष पोकळे, वसंत पडवळ, बाळासाहेब भोर,अभिजित लंघे, विठ्ठल पडवळ, माऊली पुंडे, पुणे, नगर जिल्हयातील बैल गाडामालक, अलौन्सर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.