bhagubai-jadhav-jambut

शिरूर तालुक्यात बिबट्याचा दहशतीचा कहर कायम; आठ दिवसांत दुसरा बळी…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्याचा दहशतवाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी पिंपरखेड (ता. शिरूर) येथील पाच वर्षीय चिमुरडी शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा बिबट्याने मानवी जीव घेतला आहे.

जांबुत (ता. शिरूर) येथील थोरातवस्ती येथे बुधवार (दि. २२) रोजी पहाटे सहाच्या सुमारास साठ वर्षीय भागुबाई रंगनाथ जाधव या महिलेवर बिबट्याने घराबाहेर लघुशंकेसाठी गेल्याच्या क्षणी हल्ला केला. बिबट्याने त्यांना घराजवळून जवळपास पाचशे फूट दूर असलेल्या उसाच्या शेतात ओढत नेऊन ठार मारले. या घटनेनंतर संपूर्ण गावात भीती, संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठ दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यातील ही दुसरी मनुष्यहानी असून, वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. शिवन्या बोंबे प्रकरणानंतर “या भागात शंभर पिंजरे लावले जातील” असे आश्वासन जुन्नरचे उपवनसंरक्षक संतोष खाडे यांनी दिले होते. परंतु प्रत्यक्षात पिंपरखेड परिसरात केवळ दहा पिंजरे लावले गेले, त्यापैकी सातच कार्यान्वित आहेत.

दरम्यान, मागील घटनेनंतर पंचतळे येथे ग्रामस्थांनी तब्बल सहा तास रास्ता रोको आंदोलन करून वनविभागाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला होता. मात्र, आजच्या घटनेनंतर लोकांच्या भावना संतप्त आणि उग्र झाल्या आहेत. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, “जांबुत-पिंपरखेड परिसरात तब्बल ३०० च्या घरात बिबट्यांची संख्या असावी,” असा अंदाज आहे. परंतु योग्य वेळी उपाययोजना न केल्याने वनविभागाच्या ढिलाईचा थेट परिणाम आता जीवितहानीवर होत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
या भागात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्य ठार होण्याची ही आठवी घटना असून, वारंवार मागणी करूनही वनविभागाने ठोस कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचे स्थानिक नागरिकांचे आरोप आहेत.

गावकऱ्यांच्या संतप्त भावना अशा शब्दांत व्यक्त केल्या आहेत की, ‘शेतकऱ्यांच्या विनंतीला वनविभागाने केराची टोपली दाखवली; आता आमच्या जीवाचा प्रश्न आहे. ठोस पावले उचलली नाहीत, तर ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील.’ तत्काळ अतिरिक्त पिंजरे बसवावेत.

मानव-वाघ संघर्ष टाळण्यासाठी गस्ती पथक वाढवावे,नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी,दीर्घकालीन उपाययोजनेसाठी विशेष बैठक आयोजित करावी वनविभागाची निष्क्रियता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात भीतीचे सावट गडद होत चालले आहे. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.

शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Video; शिरुर तालुक्यात बिबट–मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम

Video; कुत्राही मैत्रीला जागला…बिबट कुत्र्याच्या हल्ल्यात सहकारी कुत्र्याची मित्राला वाचविन्यासाठी धडपड…

Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे नर बिबट्या जेरबंद ; वनविभागाची कारवाई

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत