तेहसीन शेख यांना राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणून कोरेगाव पार्क येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात त्यांचे प्रवेश निश्चित करुन देणाऱ्या डॉन बॉस्कॉ सुरक्षा संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक तेहसीन शेख यांना सदगुरु सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान करत सन्मानित करण्यात आले आहे.

सामाजिक कार्याच्या माध्यमातून काम करणाऱ्या तेहसीन शेख यांनी अनेक मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले असून महिलांच्या रोजगारांसह, आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या घटकांसाठी त्यांचे कार्य सुरु आहे. यापूर्वी त्यांनी यापूर्वी डॉन बॉस्क संस्थेत दिवाळी व ख्रिसमसचे वेळी गरजुंसाठी फ्री मॉल संकल्पना राबवली होती. यापूर्वी त्यांना संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे, तर नुकताच पुणे येथील पत्रकार भवन येथे स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव, आंतरराष्ट्रीय युवाशक्ती दिन व अहिल्याबाई होळकर पुण्यदिनानिमित्त निमित्ताने आयोजित कार्यक्रमात तेहसीन शेख यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बालरंजन केंद्राच्या संस्थापिका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, बुल क्लबचे संस्थापक अविनाश निमसे, ओबीसी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे, प्रवीण शिंदे, गीतकार दिगदर्शक हृदयमानव अशोक, सदगुरु सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन म्हसे, प्रवीण महाजन यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.