शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास वाघाळे गावचे माजी सरपंच तुकाराम ऊर्फ पप्पू भोसले यांनी व्यक्त केला आहे.
शिरूर तालुक्यातील वाघाळे गावचे सरपंचपदी असताना पप्पू भोसले यांनी गावचा मोठा विकास केला आहे. शिरूर तालुक्यातील शेतकरी, रांजणगाव एमआयडीसीमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळे विविध विषयांवर काम करणार आहे. राजकारण नव्हे तर समाजकारण करत पुढे जात असून, कामाच्या जोरावरच कारेगाव गणातून निवडूण येणार आहे, असे पप्पू भोसले यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.
शिरूर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी…
गट व ‘गन’ जाहीर होताच मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू; आखाडात स्नेहभोजन की निवडणूक प्रचार?