Mangaldas Bandal

तिरंगी लढत! शिरूर लोकसभेच्या निवडणूकीत उतरले मंगलदास बांदल…

मुख्य बातम्या राजकीय

शिरूर (तेजस फडके): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता शिरूरमध्ये तिरंगी लढत होणार आहे. मंगलदास बांदल यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील हे उभे ठाकणार आहेत. बांदल यांच्या निर्णयामुळे शिरूर लोकसभेची निवडणूक अतिशय रंगतदार होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मंगलदास बांदल हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक मी लढणार आणि जिंकणार असं बांदल यांनी सांगितले. तसेच सध्या राज्यातील सर्व समीकरणे बदलली असून त्याचा फायदा मला नक्की होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मंगलदास बांदल यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरत आढळराव पाटील यांना घरी बसविणारच अशी शपथ गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी घेतली होती. परंतु, निवडणुकीपूर्वी अचानक त्यांनी माघार घेत राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना पाठींबा दर्शवत उमेदवार निवडून आणण्याची शपथ घेत उमेदवार निवडून देखील आणला होता.

राज्यातील सध्याची राजकीय स्थिती गोंधळाची आहे, त्यामुळे आगीतून उठून फुफाट्यात पडायचे जाणीवपूर्वक टाळत असल्याचे सांगत आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बांदल यांनी जाहीर केले. कोणी कितीही अडविण्याचा प्रयत्न केला, तरी मी राजकारणातून बाजूला जाणार नाही. आगामी निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लढविणार आहे. जिरवाजिरवीच्या राजकारणातून माझ्याविरूद्धचे दहा-पंधरा वर्षांपूर्वीचे आर्थिक गुन्हे उकरून काढले गेले. मला झालेली जेलवारी राजकीय हेतूने प्रेरीतच होती, असा आरोप मंगलदास बांदल यांनी यावेळी केला.

दरम्यान, मंगलदास बांदल यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केल्याने शिरूर लोकसभेची जागा चर्चेत यायला सुरुवात झाली आहे. आगामी काळात जसा प्रचार जोर धरू लागेल, तसे शिरूरचे राजकीय वातावरण तापणार आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

मंगलदास बांदल यांच्या डोक्यात नेमके काय?

मंगलदास बांदलांनी घेतली पार्थ पवार ची भेट

शिरुर तालुक्यात बांदलांचा लागेना मेळ, मांढरेंचा कळेना खेळ…

गडी एकटा निघाला…मंगलदास बांदल पुन्हा मैदानात