gawade-pawar-pacharne

शिरूर तालुक्यात तीन माजी आमदारांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला…

मुख्य बातम्या राजकीय शिरूर तालुका

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत यंदा राजकीय चुरस कमालीची वाढली असून तीन माजी आमदारांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र दिसत आहे. शिरूर तालुक्यातील तीन माजी आमदारांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मांडवगण-वडगाव रासाई गटात माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार, शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात माजी आमदार स्व बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे तर कवठे-टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र राजेंद्र गावडे हे निवडणूकीला सामोरे जात आहेत. विविध गटांमध्ये कुटुंबीय उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीला भावनिक आणि प्रतिष्ठेची किनार मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

मांडवगण-वडगाव रासाई जिल्हा परिषद गट…
शिरूर तालुक्यातील मांडवगण-वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. या गटात पवार कुटुंबाचा दीर्घकाळ राजकीय प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ स्थानिकच नव्हे तर तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विकासकामे, संपर्क आणि सहानुभूती या तीन मुद्द्यांवर प्रचार केंद्रित करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गट…
शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या कार्याची आठवण आणि त्यांच्या राजकीय वारशावर मतदारांचा प्रतिसाद काय मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या गटात भावनिक वातावरण निर्माण झाले असून पाचर्णे कुटुंबाच्या नेतृत्वावर मतदार पुन्हा विश्वास दाखवतात का, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

कवठे-टाकळी हाजी जिल्हा परिषद गट…
कवठे-टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र राजेंद्र गावडे यांना ऐनवेळी राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजेंद्र गावडे हे भाजपकडून निवडणूक लढवत असून, त्यांच्या विरोधातील उमेदवारही तेवढ्याच ताकदीचे समजले जात आहेत. शिरूर तालुक्यातील बेट भागात गावडे कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. परंतु, यंदा राष्ट्रवादीने तिकिट नाकारल्यामुळे त्यांनी भाजपची वाट धरली. यामुळे या गटात चुरशीची लढत अपेक्षित आहे. युवक नेतृत्वाचा मुद्दा आणि विकासाची आश्वासने यावर त्यांचा प्रचार सुरू आहे.

शिरूर तालुक्यातील तिन्ही गटांमध्ये राजकीय वारसा, कुटुंबीयांची ओळख आणि स्थानिक विकासाचा मुद्दा यांचा संगम दिसून येत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची न राहता प्रतिष्ठेची लढाई ठरत आहे. या निकालातून शिरूर तालुक्यातील भविष्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मतदार विकासकामांना प्राधान्य देतात की पारंपरिक नेतृत्वावर विश्वास ठेवतात, हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. या तिन्ही गटांतील निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरत्या मर्यादित न राहता राजकीय वारसा टिकवण्याची लढाई म्हणून पाहिल्या जात आहेत. त्यामुळे मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, यावर भविष्यातील तालुक्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरूर! आमदार माऊली कटकेचां ‘राष्ट्रवादी’ ला घरचा आहेर, अजित दादांच्या शोकसभेच्या निमित्ताने…

शिरूर तालुक्यातील नागरिकांचा तृप्ती सरोदे यांच्यावरचा विश्वास उडाला; कारण…

शिरूर! जिल्हा परिषद गट टाकळी हाजीत कोणता पक्ष ठरणार श्रेष्ठ …

शिरूर तालुक्यात ZP, पंचायत समितीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप…

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)