शिरूर! आमदार माऊली कटकेचां ‘राष्ट्रवादी’ ला घरचा आहेर, अजित दादांच्या शोकसभेच्या निमित्ताने…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) ‘शिरुर-हवेली’ चे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके हे सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिरुर तालुक्यातील ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’ च्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. परंतु मांडवगण-वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार या ‘राष्ट्रवादी पक्षाच्या’ अधिकृत उमेदवार म्हणुन उभ्या असतानाही आमदार कटके मात्र अपक्ष उमेदवार दादा पाटील फराटे यांचा प्रचार करत असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी ला घरचा आहेर दिलाय अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

सन 2024 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत माऊली कटके यांनी अशोक पवार यांचा 75 हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर शिरुर नगरपरिषद निवडणुकी दरम्यान अशोक पवार आणि माऊली कटके यांच्यात मतदान केंद्रात प्रवेश केल्यामुळे खडाजंगी झाली होती. परंतु त्यानंतर पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्व अजित पवार यांच्या प्रचार सभेला माऊली कटकें आणि अशोक पवार एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर अशोक पवार आणि माऊली कटके यांच मनोमिलन होईल असा कार्यकर्त्यांचा अंदाज होता.

पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर मात्र आता परिस्थिती वेगळीच आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाकडुन मांडवगण-वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांना ‘राष्ट्रवादी पक्षाने’ अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दादापाटील फराटे यांनी ‘स्वाभिमानी विकास आघाडी’ करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

सध्या शिरुर तालुक्यात आमदार माऊली कटके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेद्वारांच्या प्रचारानिमित्त फिरत आहेत. परंतु मांडवगण-वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात मात्र आमदार कटके हे अजित पवारांच्या शोकसभेच्या निमित्ताने अपक्ष उमेदवार दादापाटील फराटे यांचा उघडपणे प्रचार करत आहेत. त्यामुळे आमदार कटके यांनी राष्ट्रवादी पक्षाला घरचा आहेर दिल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरूर! आमदार माऊली कटके यांचा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीतील दुटप्पीपणा उघड

शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारच्या धडकेने चिमुकली उडाली चेंडूसारखी…

आमदार माऊली कटके यांच्या दुर्लक्षाने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी…?

आमदार माऊली कटके यांच्या प्रयत्नातून एस.टी. बससेवेचे लोकार्पण, आढावा दौऱ्याची यशस्वी सांगता

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)