शिरुर शहरात जमिनीलगत कापलेल्या विजेच्या खांबामुळे अपघाताचा धोका…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील ग्रामीण रुग्णालय ते निर्माण प्लाझा या रस्त्यावर शरद बँकेसमोर महावितरणच्या जमिनीलगत कापलेल्या विजेच्या खांबामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला असुन दिवसा तसेच रात्रीच्या वेळेस हा खांब न दिसल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वी एक चारचाकी कार या खांबाला धडकल्यामुळे कारच्या पुढच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा खांब कायमस्वरुपी हटविण्यात यावा अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

शिरुर येथील ग्रामीण रुग्णालय ते निर्माण प्लाझा या रस्त्यावर कायम वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर शरद बँकच्या समोरचं हा विजेचा खांब जमिनीलगत कापलेला आहे. काही दिवसांपुर्वी फोटोग्राफर युवराज राजेनिंबाळकर हे या रस्त्याने प्रवास करत असताना यांना हा धोकादायक खांब न दिसल्याने त्यांच्या कारची पुढची बाजु या खांबाला धडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर त्यांनी स्वतः या खांबाला दोन्ही बाजूने रेडीयम आणुन चिटकवले.

 

परंतु अजुनही या खांबामुळे दिवसा किंवा रात्री गंभीर अपघात होण्याचा धोका कायम असुन महावितरण कंपनीने हा धोकादायक विजेचा खांब तिथुन कायमस्वरुपी हटवावा अशी मागणी युवराज राजेनिंबाळकर तसेच वाहनचालकांनी यांनी केली आहे.