शिरूरमध्ये शिवसेना युवासेनेच्या वतीने राजेश सोनवणे यांना वाहीली श्रद्धांजली

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर – हवेली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (ठाकरे गट) संपर्क प्रमुख स्व.राजेश सोनवणे यांचे शिरुरमध्ये काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांना शिरुर शहरांमध्ये शिवसेना- युवासेना (ठाकरे गट) यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

स्व.राजेश सोनवणे हे मुळचे शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटयाचे रहिवाशी होते. त्यांचे वडील मुंबईमध्ये कामाला असल्याने तेही त्यांच्याबरोबर दादर येथे वास्तव्य करत होते. त्यांनी शिरूर तालुका व पुणे जिल्हयातील लोकांना एकत्र करून मुंबईमध्ये शिवसेना वाढवण्यासाठी पुढाकार घेतला होता.

ग्रामीण भागातील या कार्यकर्त्याचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी थेट संबंध होते. त्यामुळे त्यांनी सन 1९९२ ते २०२३ पर्यंत त्यांनी शिरूर तालुक्यात शिवसेना घराघरात पोहचवण्याचे काम केले. १९९६ साल ते हयात असे पर्यंत ते शिरुर हवेली मतदार संघाचे संपर्क प्रमुख म्हणुण चांगल्या प्रकारे काम पाहत होते. त्यांचे वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांना शिवसेना व युवासेना पक्षाच्या वतीने शिरूर येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी शिवसेना मा. शहर प्रमुख, शिरूर सुनीलदादा जाधव, शिवसेना युवासेना शहर अधिकारी स्वप्नीलआण्णा रेड्डी, शिवसेना युवा नेते अविनाश घोगरे, जेष्ठ शिवसैनिक सुनील जठार, राष्ट्रवादीचे युवा नेते रंजन झांबरे, शिवसेना युवासेना तालुका सरचिटणीस राहूल मोहळकर, शिवसेना युवासेना संघटक शहर सिद्धांत चव्हाण, शिवसैनिक महेंद्र येवले आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.