श्रीगोंदा पोलिसांनी सराईत गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

मुख्य बातम्या

श्रीगोंदा: विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जे. शेखर पाटील, पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी मधील सराईत गुन्हेगार शोधण्याची विशेष मोहीम राबविण्याबाबत आदेश केलेले आहेत. त्याच अनुषंगाने श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस उपनिरीक्षक समिर अभंग, प्रदिप बो-हाडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना सुचना देवुन शेडगाव फाटा (ता.श्रीगोंदा) येथे दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हेगारी वस्त्यांवर कोंबिंग ऑपरेशन करण्यासाठी सांगितले होते. या कॉबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांना एक संशयित व्यक्ती मिळुन आला.

ranjangaon-mutadwar-darshan
ranjangaon-mutadwar-darshan

त्याला ताब्यात घेवुन त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता. त्याने त्याचे नाव दिपक सुरेश गायकवाड (वय 26) रा. भिंगान ता. श्रीगोंदा असे सांगितले. दिपक गायकवाड याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हिरडगाव शिवारात दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी काही व्यक्तीला मारहाण करुन जबरी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन तो दोन तिन वर्षापासुन वेशांतर करुन पोलीसांना चकवा देत होता. आरोपी दिपक गायकवाड हा दरोडा, जबरी चोरी दरोड्याची तयारी, मोटार सायकल चोरी, डी. पी. चोरी अशा अनेक गुन्ह्यांमध्ये फरार होता. त्याच्याकडुन 4 मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

या आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्याच्याकडे कसुन चौकशी करणार असुन सदर आरोपीकडुन आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव,पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल सुर्यवंशी हे करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढीकले पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, सुनिल सुर्यवंशी, प्रदिप बो-हाडे, पोलीस नाईक गोकुळ इंगवले, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर, रविंद्र जाधव यांनी केली
आहे.