कोरेगाव भीमात कुलूप तोडून पैसे चोरणारा अटक

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एका बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील पस्तीस हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्याला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले असून मनोज उर्फ मन्या उर्फ अर्जुन राजेंद्र भंडारे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील चंद्रकांत कुंभार हे 25 फेब्रुवारी २०२३ रोजी बाहेर गेलेले असताना अज्ञात युवकाने घराचे कुलूप तोडून कपाटातील 35 हजार रुपये चोरून नेले होते. याबाबत चंद्रकांत देविदास कुंभार (वय ६०) रा. गणेश नगर कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी नुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले होते.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत असताना या गुन्ह्यातील आरोपी सणसवाडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार अमोल दांडगे, पोलीस शिपाई निखील रावडे, किशोर शिवणकर यांनी सदर ठिकाणी जात मनोज उर्फ मन्या उर्फ अर्जुन राजेंद्र भंडारे (वय २४) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे याला ताब्यात घेत अटक करत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे. मात्र सदर आरोपी कडून अजूनही काही गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता असल्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे यांनी सांगितले आहे.