पिंपळे खालसात स्वातंत्र्य सेनान्याचे जल्लोषात अभीष्टचिंतन

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे १९७६ साली आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये कारावास भोगलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पोपटराव विठ्ठलराव धुमाळ यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा एक्काहत्तर वा अभिष्टचिंतन उत्साहात साजरा केला असल्याने स्वातंत्र्यसेनानीच्या कार्याला उजाळा मिळाला आहे.

पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलराव पोपटराव धुमाळ यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे 71 वे अभिष्टचिंतन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांचे चिरंजीव नवनाथ धुमाळ, दत्तात्रय धुमाळ, सुना आशा धुमाळ, वृषाली धुमाळ, मुली अलका दौंडकर, निशा शेळके यांनी पुढाकार घेत सर्व पाहुण्यांना निमंत्रित केले. त्यानंतर स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलराव धुमाळ व त्यांच्या पत्नी विजया धुमाळ यांचे 71 दिव्यांनी औक्षण करण्यात आले.

यावेळी स्वातंत्र्य सेनानी संपत धुमाळ, शरद धुमाळ, कैलास धुमाळ, किशोर धुमाळ, सरपंच अश्विनी धुमाळ, उपसरपंच राजेन्द्र धुमाळ, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षा दिपाली शेळके, कोषाध्यक्ष बाळासाहेब शेळके, चेअरमन संभाजी धुमाळ, दिलीप धुमाळ, शिरुर केसरी विशाल धुमाळ, माजी सरपंच रमेश धुमाळ, बाबासाहेब शिंदे, हर्षद जाधव, बाळासाहेब चव्हाण, ज्ञानेश्वर शेळके, माऊली शेळके यांसह आदी उपस्थित होते, सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाळासाहेब धुमाळ, माणिक धुमाळ, रघुनाथ धुमाळ, सायली काळे, अभिषेक धुमाळ, ऋषिकेश धुमाळ, समीक्षा धुमाळ, अक्षरा ढमढेरे, साक्षी जयत, सुरज दौंडकर, सिद्धार्थ शेळके, जिजा काळे, तनुष काळे यांनी विशेष परिश्रम घेतले

तर कुटुंबीयांनी अचानक केलेल्या या कार्यक्रम व स्वागताने स्वातंत्र्यसेनानी पोपटराव धुमाळ देखील भारावून गेले होते, तर यावेळी त्यांच्या कारकीर्द बाबत बोलताना जून १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारत देशावर आणीबाणी टाकल्यावर देशात चळवळ झाली, चळवळ झाल्यावर अटल बिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण, लालकृष्ण आडवाणी यांनी सत्याग्रह चालू केले, दरम्यान माजी आमदार कै. बाबुराव दौंडकर यांनी सत्याग्रह करण्याचे ठरवल्याने शिरुर तालुक्यातील करंजावणे, पिंपळे धुमाळ, कोरेगाव भीमा, शिक्रापूर व शिरुर येथील 32 लोकांनी मिळून तळेगाव ढमढेरे येथे सत्याग्रह केला.

सत्याग्रह केल्यावर सर्वांना येरावडा येथे एक महिन्याची शिक्षा देण्यात आली, तर (दि. २४) नोव्हेंबर १९७६ रोजी जेलमध्ये असताना जेवणाची खूप हाल भोगले, मिळेल ती भाजी खाऊन जीवन जगलो, कपड्यांना उवा सुद्धा झाल्या मी एक महिन्याची शिक्षा भोगली परंतु बाबुराव दौंडकर यांना मिसा कायद्याखाली नाशिक येथे तेरा महिन्याची शिक्षा भोगावी लागली असल्याचे यावेळी स्वातंत्र्यसेनानी यांनी सांगितले.