शिरुर निकृष्ट पोषण आहार प्रकरण; अमोल कोल्हे म्हणाले, नक्की पोषण कोणाचं सुरु आहे…?

आरोग्य मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) सत्ताधाऱ्यांचं लक्ष केवळ आणि केवळ निवडणुकीवरच असल्यामुळे त्यांनी प्रशासन वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे नेमकं कोणाचं पोषण सुरु आहे हा प्रश्न आहे. गरोदर मातांचे आणि पोटातील बाळांचे पोषण होण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या कंत्राटदारांचे पोषण सुरु असल्याची टिका करत अशा कंत्राटदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.

 

शिरुर तालुक्यातील आंबळे गावात पुणे जिल्हा परीषदेच्या महिला व बाल विकास विभाग यांच्या कडुन गरोदर महिलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात अळ्या व सोनकिडे सापडल्याचा धक्कादायक प्रकार (दि 12) रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणामुळे शिरुर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असुन त्यानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

 

बाजारातून एक्सप्राइरी डेट जवळ आलेला खराब होऊ शकणारा जुना माल खरेदी करायचा आणि तो चढ्या दराने कंत्राटातून विक्री करायचा अशी साखळी समोर येत आहे. त्यामुळे हे नेमकं पोषण कोणाचं…? कंत्राटदाराच की गरोदर माता आणि पोटातल्या बाळाचं असा प्रश्न…? अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही अमोल कोल्हेंनी केली आहे.

 

शिरुर तालुक्यातील आंबळे गावात पुणे जिल्हा परीषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडुन गरोदर मातांना देण्यात आलेल्या पोषण आहारात गूळ, खारीक, काजु यात अळ्या आणि सोनकिडे आढळून आल्याने आंबळे येथील एका महिलेच्या पतीने याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट केली होती. त्यानंतर ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने सर्वप्रथम याची दखल घेत वृत्त प्रसिद्ध करत यावर आवाज उठवला.

 

गरोदर महिलांचे आरोग्य धोक्यात…?

शासनाचे उद्दिष्ट हे त्या गरोदर मातेचे आणि बाळाचे आरोग्य तंदुरुस्त चांगले राहावे. तसेच त्यांची चांगली काळजी घेण्यासाठीच हा उपक्रम आहे. परंतु शिरुर तालुक्यातील आंबळे येथे पोषण आहारातील गुळ आणि काजुमध्ये अळ्या व सोनंकिडे आढळून आले. हाच पोषण आहार गरोदर महिलांना दिल्याचं समोर आलं असुन गरोदर महिलांना योग्य पोषण देण्यासाठी ही उपाययोजना सुरु करण्यात आली आहे. त्यात असे गैरप्रकार सुरु असतील तर गरोदर महिलांचं आरोग्य आणि बाळाचं आरोग्यदेखील धोक्यात येण्याची शक्यता आहे परिणामी हे किडे विषारी असतील तर गरोदर महिलांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रशासन ऍक्टिव्ह’ मोडवर…

पुणे जिल्हा परीषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला चोभे यांनी आज (दि 13) रोजी प्रत्यक्ष आंबळे (ता. शिरुर) येथे अंगणवाडीत जाऊन सदर पोषण आहाराचा तक्रारदार महिलेच्या समक्ष पंचनामा केला. त्यानंतर हा आहार ताब्यात घेऊन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार असुन त्याचे रिपोर्ट आल्यानंतर संबधित ठेकेदार दोषी आढळून आल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे निर्मला चोभे यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले.

शिरुर तालुक्यात आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या आहारात अळ्या व सोनकीडे