सविंदणे येथील भैरवनाथ सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अरुणकुमार मोटे तर उपाध्यक्षपदी हरीभाऊ पवार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या बेट भागातील सविंदणे येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अरुणकुमार ज्ञानेश्वर मोटे तर उपाध्यक्षपदी हरीभाऊ नाना पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीचे यापूर्वीचे अध्यक्ष संभाजी पडवळ तसेच उपाध्यक्षा जनाबाई किसन पडवळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर मोटे आणि पवार यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे माजी आमदार पोपटराव गावडे, प्रदीप वळसे, डॉ सुभाष पोकळे, दामुआण्णा घोडे तसेच सविंदणे ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

 

सविंदणे येथे भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयात दि 2 जानेवारी 2024 रोजी सहाय्यक निंबधक अरुण साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी संस्था मुख्य लिपिक ए एस धायगुडे, सचिव रघुनाथ गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली हि निवड घेण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने अरुणकुमार मोटे आणि हरिभाऊ पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

या निवडीच्या वेळेस माजी सरपंच वसंत पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष बाळासाहेब भोर, संचालक रामदास पडवळ, संभाजी पडवळ, कैलास किठे, हरीभाऊ पवार, निलेश मिंडे, माणिक नरवडे, भाऊसाहेब पडवळ, बाळासाहेब पडवळ, बाळासो लंघे, नवनाथ लंघे, शोभा लंघे सरपंच शुभांगी पडवळ, ऊपसरंपच नंदा पुंडे, माजी उपसरंपच भाऊसाहेब लंघे, भोलेनाथ पडवळ, ईश्वर पडवळ, फुलाजी लंघे, जितेश पवार, बाळू पवार, बाळासाहेब पडवळ, दगडू पडवळ, दत्तात्रय नरवडे, पोपट शिंदे, जयदिप लंघे, मयूर कोळेकर, गणेश कोळेकर ,विकास गाजरे, वैभव शेलार, धोंडीभाऊ गावडे, जयकुमार मोटे, प्रकाश मेचे, महादू पोखरकर, फाकटे गावचे सरपंच शंकर पिंगळे, मनिष बोऱ्हाडे, बाबाजी बोऱ्हाडे, भिमाजी कांदळकर, पंचक्रोशितील पत्रकार व ग्रामस्थ तसेच राजकिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.