शिरुरच्या तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा मुंबई येथे गोल्डन स्टार एक्सलंट पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र मुख्य बातम्या

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मुंबई येथे आज (दि 8) महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था, इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन व अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यप्रतिमा सन्मान महासंमेलन पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी शिरुर तालुक्यात विविध क्षेत्रात सामाजिक काम व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना नॅशनल गोल्डन स्टार एक्सलंट या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व फेटा देऊन गौरविण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे प्रमुख माजी कुलगुरु एस एन पठाण, स्वराज्याचे सरसेनापती धनाजी जाधवराव यांचे थेट दहावे वंशज श्रींमत संभाजीराव जाधवराव, सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने, जीएसटीचे डेप्युटी कमिशनर यास्मिन मोलकर, इंडियन नेव्हीच्या सेवा निवृत्त लेप्टनंट कमांडर शालिनी अग्रवाल, संशोधक व आंतरराष्ट्रीय शांतीदूत डॉ अमजद खान पठान, संगीतकार दत्ता कोळी, बंजारा समाजसेवक ॲड रमेश खेमु राठोड यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात आले.

 

यावेळी नॅशनल गोल्डन स्टार एक्सलंट या पुरस्काराने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिरुर येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, आधार छाया फाऊंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे ,मनसेच्या महिला तालुकाध्यक्षा डॉ वैशाली साखरे, सामाजिक कार्यकर्त्या लता नाझिरकर, आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका बंडगर, मनस्वी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली गायकवाड, शिवसेनेच्या विजया टेमगिरे, निमोणेच्या माजी सरपंच जिजाबाई दुर्गे, मिरा नर्सिंग होमच्या डॉ सुनिता पोटे, उषा वेताळ, अंजली माने, भानुदास हंबिर, वैशाली बांगर, मंगल सासवडे,शिवाजी शेलार या सर्वांना नॅशनल गोल्डन स्टार एक्सलंट या पुरस्काराने गौरविण्यात आले.