पावसाळ्यात पायांची त्वचा आणि नखांना फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आयुर्वेदिक तेल

आरोग्य

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाळा ऋतू येताना आपल्यासोबत आनंद आणि तितक्याच समस्या देखील घेऊन येतो. पावसाळ्यात आपल्याला आरोग्यासोबतच विशेषतः पायांची देखील तितकीच काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात वातावरण ओलसर, दमट असते, हवेत भरपूर आर्द्रता असल्याने त्याचा आपल्या आरोग्यासोबतच पायांच्या नखांवर आणि त्वचेवर परिणाम होताना दिसतो. पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी, चिखल, घाण साचते आणि याचा जास्त संपर्क आपल्या पायांशीच येतो. पावसाळ्यात बरेचदा आपले पाय पाण्यात भिजून दिवसभर ओलेच राहतात किंवा घाण पाण्याच्या संपर्कात येऊन पायांची त्वचा आणि नखं खराब होतात.

पावसाळ्यात पायांची नखं आणि त्वचेवर बुरशी, खाज येणे किंवा त्वचा फाटणे, रखरखीत होणे यांसारख्या समस्या त्रास देतात. यासाठी, पायांची नखं आणि त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. पावसाळ्यात पायाची त्वचा आणि नखांची योग्य काळजी घेण्यासाठी घरगुती जादूई खास तेल कसं तयार करायचं ते पाहूयात. हे तेल तयार करायला खूप सोपं आहे. यामध्ये वापरले जाणारे घटक नैसर्गिक असून, ते अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. या तेलाचा नियमित वापर केल्यास पायांच्या नखांची बुरशी आणि त्वचेच्या इतर समस्या दूर होण्यास मदत होते. पावसाळ्यात सतत भिजणारे पाय, बंद बूट आणि दमट वातावरण यामुळे पायाची नखं आणि त्वचेवर बुरशी वाढू नये म्हणून हा खास उपाय….

पावसाळ्यात पायाची नखं आणि त्वचेवर बुरशी वाढू नये म्हणून… 

हा खास घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला २ ते ३ टेबलस्पून मोहरीचे तेल, ४ ते ५ लसूण पाकळ्या व १ टेबलस्पून हळद, १ टेबलस्पून मेथी दाणे, चिमूटभर हिंग इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.

नेमका उपाय काय आहे

पावसाळ्यात पायाची नखं आणि त्वचेवर बुरशी वाढू नये म्हणून खास घरगुती आयुर्वेदिक तेल तयार करण्यासाठी एका भांड्यात मोहरीचे तेल घेऊन ते मंद आचेवर व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर, त्यात मेथी दाणे, लसूण पाकळ्या, हळद व हिंग घालून ५ मिनिटे गरम करावे. त्यानंतर गॅस बंद करून तेल थोडे थंड होऊ द्यावे. तेल थंड झाल्यावर ते एका हवाबंद बाटलीत भरून स्टोअर करावे.

आता तयार तेल एका वाटीत घेऊन ते कॉटन बड्सच्या मदतीने पायांची नखं आणि नखांच्या आजूबाजूच्या त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्यावे. या तेलाने आपण पायाच्या त्वचेचा देखील मसाज करु शकतो. या घरगुती पारंपरिक औषधी तेलाने पावसाळ्यात पायाची त्वचा आणि नखांवर बुरशी वाढत नाही. याचबरोबर, त्वचेला खाज येणे किंवा त्वचा फाटणे, रखरखीत होणे यांसारख्या समस्या कमी होतात.

 हा उपाय कसा फायदेशीर

१( हळद: हळदीमधील अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल गुणधर्मामुळे बुरशी नष्ट करण्यास मदत करते.

२) मोहरीचे तेल: मोहरीचे तेल त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवते आणि संसर्गापासून संरक्षण करते.

३) हिंग: हिंग त्वचेची खाज आणि सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

४) लसूण पाकळ्या: लसूण पाकळ्यांमध्ये बुरशीस विरोध करणारे नैसर्गिक अँटीफंगल घटक असतात.

५) मेथी दाणे: त्वचेला पोषण देऊन सुकलेल्या व भेगाळलेल्या त्वचेला बरे करतात.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत