ताक पिण्याचे फायदे

आरोग्य

१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.

२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात सैंधवमीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.

३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.

४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.

५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

६) थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.

८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

सुचना

रात्री ताक पिणे योग्य नाही.

दुपारी जेवणानंतर ताक प्यायल्याने अन्न पचन व्यवस्थित होते.

ताकामध्ये खायचा चूना (एका लहान गव्हाच्या दाण्याएवढा) मिक्स करून प्यायल्याने वातविकार होत नाहीत.

ताकापासून तयार केलेला मठ्ठा जास्तच उपयुक्त आहे.

फक्त ताकच पिऊन उपवास केल्यास शरीर आतून लवकर साफ होते. तसेच डोळ्यांची नजर वाढते.

ताक थंड करून पिऊ नये.

(सोशल मीडियावरुन साभार)