‘पाठदुखी नको ग बाई’ असे आपण आई-आजीला म्हणताना ऐकतो. मात्र आजकाल ताईही असे म्हणायला लागली आहे का? लहानपणातच पाठदुखीचा त्रास आता फार कॉमन आहे. अगदी वीशी- तीशीतले लोकही पाठ दुखते अशी तक्रार करतात. वाढत्या वयात उलट शरीराला मजबूत करायचे असते मात्र काही सवयींमुळे लहान वयातच विविध त्रास सुरू होतात. याची कारणे अनेक आहेत. वयानुसार कारणेही बदलतात. त्यामुळे तुम्हाला होणारा त्रास नक्की कोणत्या कारणामुळे आहे हे ओळखणे गरजेचे असते. फक्त पोषणत्वांच्या कमतरतेमुळेच हे त्रास होतात असे नाही. इतरही काही कारणांमुळे पाठ दुखते.
बसण्याची पद्धत चुकीचे असेल तरी कंबर दुखते. तसेच झोपतानाही वाकडे तिकडे झोपल्यामुळे कंबर आखडते. दिर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यामुळेही कंबरेला त्रास होतो. तसेच व्यायामाचा अभाव असल्याने कंबर दुखायला लागते. स्थूलपणामुळे पाठीच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे पाठ दुखायला लागते.
काम करताना आजकाल तासंतास लॅपटॉपसमोर बसावे लागते. तसेच काही मोबाइल पाहत एकाच स्थितीत बराच वेळ बसतात किंवा झोपून राहतात. कामाच्या मध्ये ब्रेक घ्यायचा आणि एक फेर फटका मारायचा मोबाइलचा वापर योग्य तेवढाच करावा. सतत खाली वाकून बसल्यामुळेही पाठीचा कणा दुखतो.
आळस आणि व्यायाम न केल्यामुळे जसे त्रास होतात तसेच अति व्यायामानेही होतात. अनेक खेळाडूंना बरेच त्रास सहन करावे लागतात. शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे वाकडे तिकडे व्यायाम करणे. ऑनलाइन क्लास घेऊन व्यायाम करणे अशा गोष्टींमुळे पाठीवर ताण येतो. त्यामुळे शरीराची क्षमता ओळखावी. ती वाढवावी मगच कठीण व्यायाम प्रकार करावेत.
क्लीव्हलँड क्लिनिकच्या साइटवर सांगितल्यानुसार, अनेकांमध्ये अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस आढळून येतो. हा एक संधीवाताचा प्रकार आहे. मणक्यावर ताण येतो सांध्यांवर तसेच अस्थिबंधांवरही ताण येतो आणि परिणामी दुखणी सुरू होतात. तरुणांमध्ये या त्रासाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पाठ जर सातत्याने दुखत असेल तर दुर्लक्ष करु नका. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या.
(सोशल मीडियावरून साभार)