आपलं शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे, आणि ते सुरळीत चालावं यासाठी नैसर्गिक उपायांवर भर देणं हे काळाची गरज आहे. विशेषतः मूत्रमार्ग व मूत्राशयाच्या आरोग्यासाठी नारळपाणी अत्यंत उपयुक्त ठरतं. दर आठवड्याला फक्त एकदा नारळपाणी पिण्याची सवय लावली, तर पुढे कधीही मूत्राशयात खडे होण्याची शक्यता फारच कमी होते. नारळपाण्यातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील टॉक्सिन्स सहज बाहेर टाकण्यास मदत करतात.
मूत्रपिंड व मूत्रवहिन्यांना स्वच्छ ठेवण्याचे काम
नारळपाणी एक मूत्रल म्हणून काम करतं. म्हणजेच ते लघवीचे प्रमाण वाढवतं आणि त्यामुळे किडनी व मूत्रमार्ग स्वच्छ राहतात. त्यामुळे शरीरात तयार होणारे खडे नैसर्गिकरित्या बाहेर टाकले जातात किंवा त्यांचा आकार वाढत नाही. औषधांच्या तुलनेत नारळपाणी हे पूर्ण नैसर्गिक असल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ते निश्चितपणे सेवन करू शकतात. आठवड्यातून एकदा नारळपाणी पिणं मूत्रसंस्थेचं दीर्घकाळ पर्यंत संरक्षण करू शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)